गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात 103 मिलिमीटर पाऊस
गुहागर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 190 मिलिमीटर पाऊस
त्या खालोखाल लांजा तालुक्यात 128, रत्नागिरी तालुक्यात 124, संगमेश्वर तालुक्यात 116 मिलिमीटर पाऊस
23 ते 26 मे किनारी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज
किनारी भागात 50 ते 60 किलोमिटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज
समुद्र खवळलेला राहणार, किनारपट्टी भागात नागरिकांनी न जाण्याचे आवाहन
23 ते 26 मे पर्यत मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास मज्जाव
महाराष्ट्र विधानमंडळाची अंदाज समितीची आज तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकवादग्रस्त ठरलेल्या या अंदाज समितीच्या आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून
विधानमंडळ अंदाज समितीच्या कार्यक्रमालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित
धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी या एसआयटी चौकशी वरती आपला विश्वास नसल्याचे म्हटले
तुकाराम मुंढे त्याचबरोबर प्रवीण गेडाम तसेच धुळे जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यातील अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी
Nandurbar: नंदुरबारचे कृषी उत्पन्न बाजार समिती राहणार सलग पाच दिवस बंदनंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसानं थैमान घातला आहे त्यातच पुन्हा एकदा हवामान खात्याने नंदुरबार जिल्ह्याला येल्लो अलर्ट जारी केला आहे. त्याचाच परिणाम म्हणून सलग पाच दिवस कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला असून याचा फटका आता शेतकऱ्यांना बसणार आहे एकीकडे अवकाळी पावसाचा थैमान तर दुसरीकडे बंद असलेल्या बाजार समितीमुळे शेतीमाल विकायचा कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे. ..
सोलापूर शहर वाहतूक शाखेची विशेष कारवाई, बुलेटसह 46 वाहनांवर करण्यात आली कारवाई- रस्त्यावरून बेधडकपणे जादा आवाज करणारे सायलेन्सर बसवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या गाड्यांवर वाहतूक शाखेकडून करण्यात आली कारवाई
- सोलापुरातील संत तुकाराम चौक येथील वाहतूक शाखेकडून अचानक कारवाई करत 22 हजार रुपयांचा करण्यात आला दंड
- सोलापुरातील दोन ठिकाणी शहर वाहतूक शाखेकडून दहा बुलेटवर कारवाई करत सायलेन्सर करण्यात आले जप्त
- वाहतूक शाखेकडून मल्टी हॉर्न वाजवणारे वाहन,विना लायसन,फॅन्सी नंबर प्लेट,विना नंबर प्लेट अशा वाहनांवर करण्यात आली कारवाई
Matheran: माथेरानचा 175 वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरामाथेरान 1850 या दिवशी स्थापन झालेलं सर्वांचं लाडकं पर्यटनस्थळ माथेरान काल म्हणजेच 175 वर्षांचं झालं...! या खास दिवशी माथेरानमध्ये जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला, आणि फटाक्यांची आतिषबाजी करत आकाश प्रकाशमय झालं! "I LOVE माथेरान" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला, आणि नागरिकांपासून पर्यटकांपर्यंत प्रत्येकजण या क्षणाचा आनंद लुटत होता.निसर्गरम्य माथेरान, ज्याचं सौंदर्य आणि शांतता दरवर्षी लाखो पर्यटकांना भुरळ घालतं – त्याच्या 175 व्या वाढदिवसाला उपस्थित राहणं ही अनेकांसाठी आठवणींची पर्वणी ठरली!
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सलग 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने घेतली काहीशी विश्रांती1 ते 22 मे या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात ११६ मिमी पावसाची नोंद
या मान्सूनपूर्व पावसाने सोलापूर जिल्ह्यातील 142 गावात नुकसान
यामध्ये वीज पडून दोन व्यक्तींचा तर 57 जनावरांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालनुसार में महिन्यात एकूण 80 घरांची पडझड झाली असून 630 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
6 मे रोजी माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील करिष्मा विकास तांबवे यांचा तर 19 मे रोजी माढा तालुक्यातील बाळासाहेब माणिक पाटील यांचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू
1 ते 22 मे दरम्यान पडलेल्या अवकाळी पावसामुळे आणि वीज पडल्याने जिल्ह्यातील 14 लहान तर 43 मोठे अशा एकूण 57 पशुधन दगावले
याशिवाय 80 घरांची अंशतः पडझड झाली.
तसेच 1557 शेतकऱ्यांचे 630 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, आंबा यासारख्या पिकांचे नुकसान झाले.
दरम्यान ही प्राथमिक अहवालतील माहिती असून नुकसानीचे पंचनामे करुन तत्काळ संबंधितांना मदत मिळवून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Nashik News: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणींच्या तारखा घोषित करण्यासाठी अखेर १ जूनचा मुहूर्तनाशिक -
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणींच्या तारखा घोषित करण्यासाठी अखेर १ जूनचा मुहूर्त
- १ जूनला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत १३ आखाड्यांच्या २६ प्रतिनिधींची होणार बैठक
- मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आखाड्यांचे प्रतिनिधी, नाशिकमधील साधू महंतांची नाशिकमध्ये बैठक
- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला येणार वेग, बैठकीत कुंभमेळ्याचे स्वरूप होणार स्पष्ट
- सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या पर्वणींच्या तारखांची देखील होणार घोषणा
- पर्वणींच्या तारखा जाहीर झाल्यानंतर त्याच्या अनुषंगाने येणारे साधू, महंत, भाविकांची गर्दी, वाहतूक याचं नियोजन केलं जाणार
दीड लाखाची लाच घेताना वीज अभियंताव इलेक्ट्रिशन ताब्यातवरुड येथे लाचलुचपत विभागाची कारवाई..
महावितरणच्या कंत्राटदाराला मागितली होती लाच.
महेश दुपारे, आणि शरद बेलसरे अशी आरोपींची नावं आहेत..
महेश दुपारे याला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे..
या संदर्भात वरुड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे..
अधिक तपास सध्या पोलीस करीत आहेत
CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगली दौऱ्यावर, पोलीस मुख्यालयाचे करणार उद्घाटनराज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगली दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस हे पहिल्यांदाच सांगलीत येणार असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.सांगली पोलीस मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे फडणवीस यांच्या हस्ते दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उदघाटन होणार आहे. यानंतर पोलिस अधिकाऱ्यांची बैठक देखील होणार आहे.पोलीस मुख्यलयाच्या उदघाटनानंतर भाजप कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न होणार आहे.यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपा कार्यकर्त्याना मार्गदर्शन करणार आहेत,यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
कराड चिपळूण महामार्गांवरची वाहतूक ठप्पपाटण तालुक्यातील वाजेगाव गावच्या हद्दीत वाहन रस्त्यावर असलेल्या चिखलात अडकले
रस्त्याचे काम सुरु असल्याने ठेकेदाराकडून हलगर्जीपणा
सकाळपासून दोन तास वाहतूक ठप्प
रस्त्याचे काम संथगतीने सुरु, ठेकेदाराची मनमानी नागरिकांना त्रास..
सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट अतिवृष्टीचा इशारागेले तीन दिवस मान्सूनपूर्व पावसाने कोकणात धुमाकूळ घातला आहे.
पुढच्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्यंत खराब हवामानाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
नागरिकांनी सतर्क राहव असा इशारा देण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट असल्याने जोरदार पाऊस, वादळ सदृश्य परिस्थिती राहण्याची शक्यता आहे
त्यामुळे मच्छीमारांनी खबरदारी घ्यावी असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
हगवणे कुटुंबीयांनी निर्लज्जतेपणाचा कळस गाठलावैष्णवी हगवणे हिने 16 मे ला आत्महत्या केल्यानंतर राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर सुशील हरवणे हे फरार झाले होते.
मात्र वैष्णवीच्या आत्महत्येच्या दुसऱ्याच दिवशी राजेंद्र हगवणे त्यांच्या काही मित्रमंडळी सोबत तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारतानाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये राजेंद्र हगवणे आणि त्याचे काही मित्र मंडळी हॉटेलमध्ये मटणावर तव मारताना दिसत आहेत.
वैष्णवीच्या आत्महत्येमुळे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ करत आहे.
तर दुसरीकडे निर्लज्ज राजेंद्र हगवणे आपल्या मित्रांसोबत मटणावर ताव मारत असतानाची दृश्य आता समोर आली आहेत.
लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाच थैमान, मांजरा नदीला पूरजन्य परिस्थितीलातूर जिल्ह्यात मागच्या 8ते 9 दिवसापासून अवकाळी पाऊस कोसळतो आहे....
त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या त मांजरा नदीसह रेना, तावरजा तेरणा, या नद्यांना पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली...
खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे...
तर आपत्ती व्यवस्थापन देखील सज्ज ठेवण्यात आल आहे.. 8बोटी आणि 6 पथक तैनात करण्यात आले आहेत...
लातूर जिल्ह्यातील प्रमुख नदी असणाऱ्या मांजरा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे...
लोहारा येथील घनकचरा प्रकल्प हटवावा या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी स्थगितधाराशिवच्या लोहारा शहरातील घनकचरा प्रकल्पामुळे अस्वच्छता व दुर्गंधी पसरली असुन हा प्रकल्प शासकीय धान्य गोदामाजवळ नगरपंचायतीने अनाधिकृत पणे उभारल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी नगर पंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते अखेर जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी चौकशी समीती गटीत करुन तीन महीन्यात समीतीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आमदार प्रविण स्वामी यांच्या उपस्थितीत हे उपोषण मागे घेतले.
भुईबावडा घाटात काल रात्री दरड कोसळल्यामुळे वाहतूक काही वेळ होती ठप्पकणकवली व वैभववाडी तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाचा फटका वैभववाडीतील भुईबावडा घाटाला बसला. काल रात्री भुईबावडा घाटात दरड कोसळल्यामुळे काही वेळ हा घाट वाहतुकीसाठी बंद झाला होता. दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी व बांधकाम कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावरील दरड हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला. सध्या या घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे.
पोर्शे प्रकरणात आरोपी विशाल अगरवाल याचा जमीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळलाविशाल अगरवाल पोर्शे अपघातातील अल्पवयीन तरुणाचे वडील
विशाल अगरवाल याने सुप्रीम कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता
पुणे पोलिसांनी केलेली अटक अवैध असल्याचे विशाल अगरवाल याने सुप्रीम कोर्टात सांगितले
शिवानी अगरवाल म्हणजेच विशाल अगरवाल च्या पत्नीला काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला होता
पत्नीला जामीन दिल्यानंतर आता पती विशाल ने सुद्धा सुप्रीम कोर्टात अर्ज केला मात्र तो सुप्रीम कोर्टाने फेटाळला
vaishnavi hagawane: वैष्णवी हगवणे आतुरता प्रकरणात एक मोठी अपडेट समोरवैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आज पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी स्वारगेट परिसरातून पाहते अटक केली आहे. मागील आठ दिवसापासून हे आरोपी फरार झाले होते. फरार असताना हे आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होते. 17 मे ला या आरोपीनी तळेगाव या ठिकाणी का हॉटेलमध्ये त्यांचे काही मित्रांसोबत जेवण केलं होतं त्याची सीसीटीव्ही दृश्य देखील आता समोर आली आहेत. या दोन्ही फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचा मोठा आव्हान पिंपरी चिंचवड शहर पोलिसांसमोर होतं. मात्र आज अखेर या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आला आहे.
Sindhudurg: मुसळधार पावसाचा महामार्गालगत असलेल्या घरांना फटका पावसाचे पाणी घरात घुसलेसिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या पावशी भोगटेवाडी येथील घरांना बसला. सर्व्हिस रोडवर गटार नसल्याने संपूर्ण पावसाचे पाणी महामार्गालगतच्या घरांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे. महामार्ग प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना या पाण्याच्या समस्येचा त्रास सहन करावा लागला आहे.
अमरावतीच्या मेळघाटातील अतिदुर्गम भागातील ३८ गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा आज मुक्कामएक दिवस मेळघाट' साठी या उपक्रमांतर्गत हा मुक्काम असणार आहे...
जिल्हा परिषदेच्या सीईओ संजिता महापात्र ह्या कुटिदा गावात मुक्काम ठोकणार आहेत...
मेळघाटातील 38 गावांना दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा फटका बसतो...
यातील कुटीदा, बिच्चुखेडा, रेट्याखेडा, कुही, बोराट्याखेडा, खडीमल, डोमी, चुनखडी, माडीझडप, रक्षा यासह विविध गावांचा संपर्क हा पावसाळ्यात तुटतो...
त्यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून या गावांमध्ये आज मुक्काम ठोकून येथील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार....
आदिवासी नागरिकांसोबत अधिकाऱ्यांकडून संवाद साधला जाणार आहे...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाची आज किल्ले रायगडावर सांगताराष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मंगल कलश यात्रेचा आज किल्ले रायगडावर समारोप होत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे आदींसह प्रदेश राष्ट्रवादीचे पदाधिकारी हजर राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५ व्या दिना निमित्त राज्यभर ही यात्रा काढण्यात आली. आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून यात्रेची सांगता होईल.
Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात ड्रोन उडविण्यास बंदीपाकिस्तान सोबतच्या युद्धानंतर देशांतर्गत सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले आहे.
याचाच एक भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यात ड्रोन अथवा मानवरहित हवाई यंत्र याचा वापर करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे.
3 जूनच्या दुपारी बारा वाजेपर्यंत बंदी कायम राहणार आहे.यवतमाळचे जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी हा आदेश जारी केला आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या स्थळांना धोका निर्माण होऊ शकतो, तसेच सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे.
अशा उपकरणांचा अनियंत्रित वापर टाळण्यासाठी ड्रोन व मानरहित हवाई यंत्र उडवण्यास बंदी घातली आहे.
Bhandara Accident: भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, तुमसर-गोबरवाही मार्गावर भीषण अपघातभंडारा जिल्ह्यातील तुमसर-गोबरवाही मार्गावरील टुमनी नाल्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात परसवाडा (दे.) येथील तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडते व्यापारी प्रविन खवास (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक प्रविन खवास हे दुचाकी ने तुमसरहून गोबरवाहीकडे धान्य खरेदी करीता जात होते. दरम्यान, टुमनी नाल्याजवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने प्रविन खवास यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, परिसरात काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.मृतक प्रविनच्या मृत्यू नंतर बाजार समितीतील सहकार्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे.अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत.
Raigad: किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग 28 आणि 29 मे रोजी बंद राहणारकिल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग 28 आणि 29 मे रोजी पर्यटक, प्रवाशांसाठी बंद राहणार आहे.
पायरी मार्गालगत असलेल्या डोंगरकड्यांवरील दगड, दरडी मोकळ्या करण्याचे काम या दोन दिवसात प्रशासनाकडून केले जाणार आहे.
या कामात मुंबईच्या दुर्गवीर प्रतिष्ठानचे स्वयंसेवक सहकार्य करणार आहेत. येत्या 6 आणि 9 जून रोजी रायगडावर शिवराज्यभिषेक दिन सोहळा साजरा होणार आहे.
यावेळी हजारो शिवभक्त पायरी मार्गाने रायगडावर येत असतात.
दोन वर्षांपूर्वी शिवराज्यभिषेक दिनी डोंगरावरील दगड अंगावर कोसळून एकाचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जात आहे.
Ratnagiri Rain: रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्टचा ईशारातर 24 व 25 मे कालावधीत जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह व वादळीवाऱ्यासह पाऊस पडेल
ताशी 50 ते 60 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता...
नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन