"त्याने फोन तरी.." परेश यांनी हेरा फेरी 3 सोडल्याचं समजताच अक्षय कुमार ढसाढसा रडला; दिग्दर्शक म्हणाले..
esakal May 23, 2025 05:45 PM

Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय सिनेमा म्हणजे हेरा फेरी. प्रियदर्शन दिग्दर्शित या सिनेमाचे आतापर्यंत दोन भाग आले आहेत आणि आता बरीच वर्षांनी या सिनेमाचा तिसरा भाग रिलीज होणार आहे. प्रेक्षक या सिनेमासाठी उत्सुक असतानाच परेश रावल यांनी हा सिनेमा सोडल्याचं जाहीर केलं. ज्याचा अनेकांना धक्का बसला.

परेश राहिलं यांच्या निर्णयाने अनेक चाहते नाराज झाले आहेत. त्यातच दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी अक्षय कुमार बाबत एक महत्त्वपूर्ण खुलासा केला. परेश यांच्या निर्णयाचा अक्षयला खूप मोठा धक्का बसल्याच त्यांनी सांगितलं.

प्रियदर्शन यांनी मिड डेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की,"या सिनेमासाठी सगळ्या कलाकारांचे कॉन्ट्रॅक्ट साइन झाले होते. 10 दिवसांपूर्वी अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश राळ टीझर शूट करणार होते. जो आयपीएल फायनल पूर्वी रिलीज होणार होता. आम्ही सगळेच हेरा फेरी 3 साठी उत्सुक होतो आणि सगळ्यांचा होकारही होता या सिनेमासाठी. अक्षयने स्वतः या सिनेमाची पूर्ण तयारी केली होती. "

"अक्षय भावनिकदृष्ट्या या सिनेमाच्या खूप जवळ आहे. जेव्हा परेशच्या सिनेमा सोडण्याच्या निर्णयाबद्दल त्याला समजलं तेव्हा तो भावूक झाला. तो रडू लागला आणि त्याने मला विचारलं की परेश असं का करतोय ? जर त्याला सिनेमा करायचा नव्हता अक्षयाच्याही पैशांचं नुकसान त्याने केलं नाही पाहिजे. मी समजू शकतो की अक्षयने परेशला नोटीस का पाठवली असेल. शेवटी परेशला जो काही निर्णय घ्यायचा होता त्यापूर्वी त्याने एकदा आमच्याशी बोलायला पाहिजे होतं. आम्ही खूप वर्षांपासून मित्र आहोत. एका फोनवर तो सगळं सांगू शकला असता. "

"परेशने मला या निर्णयाबद्दल काहीच सांगितलं नाही, गेल्या आठवड्यातच मी अक्षयबरोबर भूतबंगला सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. त्याचवेळी मला याविषयी समजलं. अक्षयला परेशच्या निर्णयाबद्दल समजल्यावर रडू कोसळलं." असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, परेश यांनी हा सिनेमा सोडल्यावर अक्षयने त्यांना कायदेशी नोटीस पाठवली आहे. परेश या सिनेमात परत येणार की बाबुराव म्हणून दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.