छगन भुजबळ मंत्री कोणामुळे झाले याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्यासाठी आग्रही होते हे खरे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीसुद्धा प्रयत्न केले. असे असले तरी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून मंत्री झालो आहे. मी भाजपचा मंत्री नाही, असे स्पष्ट करून त्यांनी टीका करणाऱ्यालाही उत्तर दिले.
हवामान विभागाकडून मोठी अपडेट! कोकण,मराठवाड्यासह विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यताभारतीय हवामान विभागाकडून शुक्रवारी(ता. 23 मे) महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा तसेच आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी गुड न्यूजशेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुड न्यूज दिली आहे. आता शेतरस्त्याची किमान रुंदी ३ मीटर असणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. प्रत्येक शेतरस्ताप्रकरणाचा निर्णय ९० दिवसांत देणं बंधनकारक आहे, शेतरस्त्याची नोंद आता ७/१२ च्या ‘इतर हक्कां’मध्येच होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बंद करा: भिडे गुरुजीKolhapur News: सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला पाहिजे, असे मत संभाजी भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत आहे. तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत, असे ते म्हणाले. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको, या कुत्र्याचं राजकारण करू नका. वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत, हे तपासले पाहिजे, असे भिडे म्हणाले. याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना वैष्णली हगवणे मृत्यू प्रकरणी सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज (गुरुवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलगी आणि सून यात फरक करणाऱ्यांना इशारा दिला आहे.
हगवणे बाप-लेक फरार असताना कोल्हापूर, पवनानगर ,तळेगाव, स्वारगेट परिसरातवैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार असताना पवनानगर ,तळेगाव ,स्वारगेट परिसरात फिरत होते, याबाबतचे सीसीटीव्हीचे फुटेच पोलिसांच्या हाती लागले आहे. राजेंद्र हगवणे व सुशील हगवणे बावधनच्या मुहूर्त लॉन्स ,कोल्हापूर, पवनानगर ,तळेगाव ,स्वारगेट या भागात फिरत असल्याचे आढळले आहे.
हगवणे पिता पुत्रांना राजकीय पाठबळ - सुषमा अंधारेवैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि त्यांचे पुत्र सुशील हगवणे यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली की त्यांची स्वतः होऊन सरेंडर केले हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांनी जर सरेंडर केले असेल तर त्यांना राजकीय पाठबण आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
राजेंद्र हगवणेंना दुपारी दोनला कोर्टात हजर करणारबावधन पोलिसांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अटक केल्यानंतर स्टेशन डायरी नोंद केली. राजेंद्र हगवणे व सुशील हगवणे ला शिवाजीनगर कोर्टात दुपारी दोन वाजता हजर करण्यात येणार आहे. राजेंद्र व सुशील ला कोणी मदत केली. ते कुठल्या ठिकाणी लपून बसले होते त्याचा शोध घ्यायचा आहे अशी अनेक कारणावर पोलिस मागणार रिमांड मागणार आहेत.
धुळे कॅश प्रकरणात कक्ष अधिकारी किशोर पाटील निलंबितधुळे कॅश प्रकरणात एसआयटी नेमण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. किशोर पाटील यांच्या नावाने विश्रामगृहातील खोली बूक होती. या खोलीमध्ये तब्बल एक कोटी 84 लाखांची रोकड सापडली आहे.
Vaishnavi Hagawane Death : वैष्णवी मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे अन् सुशील हगवणेंना अटकवैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आज (शुक्रवार) पहाटे पहाटे 4.30 वाजता पोलिसांकडून अटक करण्यात आली.सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील फरार होते. मिळालेाल्या माहिनुसार हे दोघे स्वतःहून पोलिसांच्या समोर हजर झाले.