Latest Marathi News Live Updates : "हगवणे कुटूंबाचं वकीलपत्र घेऊ नका" कस्पटे कुटूंबाची बार असोसिएशनला विनंती
esakal May 23, 2025 09:45 PM
Live : भाजपच्या महिला पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचा बाची

भाजपच्या महिला पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये बाचा बाची

आंदोलन करताना गेटवरून बाजूला करताना महिला कार्यकर्त्या आणि पोलिसांमध्ये वाद

आंदोलन करताना आम्हाला अडवू नका महिला कार्यकर्त्यांची मागणी

तर कोर्टच्या गेटच्या बाहेर पोलिसांकडून दोरखंड लावत बंदोबस्त

Live : तुर्कीशी असलेला करार इंडिगो ने त्वरित करार रद्द करावा

तुर्की कंपनीसोबत असलेला करार रद्द करण्यासाठी इंडिगो कंपनीला दहा दिवसांची मुदत

करार रद्द न केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ

आमदार मुरजी पटेल यांचा इशारा

Live : पालघरमध्ये मान्सूनची दमदार हजेरी

पालघर जिल्ह्यातील केळवा, मनोर, सफाळेमध्ये विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात येलो अलर्ट दिला आहे.

Pune Live : "हगवणे कुटूंबाचं वकीलपत्र घेऊ नका" कस्पटे कुटूंबाची बार असोसिएशनला विनंती

वैष्णवी कस्पटे यांच्या मृत्यू झालेल्या प्रकरणी आपण कोणीही वकीलपत्र न घेण्याबाबत विनंती अर्ज

कस्पटे कुटुंबीयांचे पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष यांना पत्र

१६ मे रोजी झालेली घटना अत्यंत दुखद व महाराष्ट्राला कालिमा फासणारी आहे तशीच आपणास नम्र विनंती अर्ज करतो की आपण कोणीही या आरोपीचे वकील पत्र घेऊ नये असे पत्र कस्पटे कुटुंबीयांनी लिहिलं आहे

या घटनेला आम्हाला न्याय देण्यास प्रयत्न करावा ही अशी विनंती कुटुंबीयांनी बार असोसिएशनला केली आहे

Live : पुण्यात हगवणे कुटुंबाविरोधात भाजप महिला आघाडी आक्रमक

पुण्यात हगवणे कुटुंबाविरोधात भाजप महिला आघाडी आक्रमक

हगवणे कुटुंबाविरोधात भाजपची महिला आघाडी करणार आंदोलन

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर भाजप महिला आघाडीचे आंदोलन

आज दुपारी वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणे यांना कोर्टात हजर करतेवेळी महिला आघाडी करणारा आंदोलन

आज सकाळी दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर थोड्याच वेळात पोलीस या दोन आरोपींना करणार कोर्टात हजर

Thane Live: विजेच्या धक्क्याने मुलगा दगावला

ठाण्यात विजेच्या धक्क्याने १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. राजेश पवार मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. राजेश पवार सिग्नल खांब ला लागून असलेल्या शिडीवर खेळताना चढला असता विजेच्या धक्क्याने खाली कोसळला.

कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात

एकीकडे अवकाळी पावसाने अस्मानी तर दुसरीकडे कांद्याला निच्चांकी बाजार भाव मिळत असल्याने सुल्तानी संकटात कांदा उत्पादक शेतकरी सापडला आहे. येवला बाजार समितीत गोल्टी कांद्याला 135 रुपये प्रति क्विंटलला बाजार भाव आहे. म्हणजे 1 रुपया 35 पैसे किलो. त्यामुळे उत्पादनासाठी लागलेला खर्च देखील निघणार नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Eknath Shinde Live: ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारचं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट

ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आता हाती घेतलं आहे.  यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “नक्षलवाद जवळपास संपुष्टात आणला आहे. सरकारने नक्षलवाद्यांचे पूर्ण कंबरड मोडून काढलं आहे. केंद्र सरकारने ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हाती घेतलं आहे.संपूर्ण देशावा मोदींचा अभिमान वाटतोय.”

बीएसएफच्या पुरस्कार प्रदान सोहळ्याला अमित शहा यांनी केलं संबोधित

बीएसएफच्या पुरस्कार प्रदान सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं संबोधित. पहलगामध्ये धर्म विचारुन निष्पाप लोकांची हत्या करणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना #OperationSindoor हेच उत्तर आहे - अमित शहा.  

छगन भुजवळांकडे अन्न, नागरी पुरवठा खातं

छगन भुजवळांकडे अन्न, नागरी पुरवठा खातं देण्यात आले आहे.

Vaishnavi Hagwane: वैष्णवी प्रकरणात आरोपींना मरेपर्यंत फाशी द्या - चित्रा वाघ

वैष्णवी हगवणे प्रकरणात सासरा आणि दिराला अटक झाल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते की आरोपींना मरेपर्यंत फाशी द्या. या प्रकरणात सरकारकडून चांगले वकील उभे राहतील, फास्ट ट्रॅकवर हे प्रकरण चालेल. हगवणे कुटुंबाला असा धडा शिकवला जाईल की पुन्हा कोणी लेकी-बाळीला हात लावायचा विचार करणार नाही. वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी जगताप पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेली, त्यावेळी तक्रार घेतली गेली नाही, अशा अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल.

Kolhapur Live : 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करा - संभाजी भिडे

शिवराज्याभिषेक सोहळ्याचा राजकारणासाठी वापर होत आहे. तिथीप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडले पाहिजेत. त्यामुळं 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करा, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे.

रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको. या कुत्र्याचं राजकारण करू नये, वाघ्या कुत्र्याबद्दल जे इतिहास संशोधक बोलतात ते कोणत्या उंचीचे आहेत. याबाबत एक स्वतंत्र इतिहास संशोधक मंडळ स्थापन करून त्याबाबत निर्णय घ्यावा. हुंडा देण्याची प्रथा ही पूर्णपणे बंद केली पाहिजे, असंही संभाजी भिडेंनी म्हटलं आहे.

Beed Firing : बीडमध्ये पुन्हा गोळीबार, पवनचक्कीच्या वादातून एक जण जखमी

बीडमधील नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पवनचक्कीच्या वादातून गोळीबार झाला आहे. यामध्ये एकजण जखमी झाला आहे.

Kolhapur Live : कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीस अन् संभाजी भिडेंची भेट

कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संभाजी भिडे यांची भेट झाली आहे. या भेटीमध्ये त्यांच्यावर बराच वेळ चर्चा झाल्याचीही माहिती मिळते आहे.

Nashik Live : जिंदाल कंपनीला लागलेली आग अखेर नियंत्रणात

जिंदाल कंपनीला लागलेली आग अखेर नियंत्रणात

धोका पूर्णपणे टळला, फक्त कूलिंग ऑपरेशन सुरू असल्याची अग्निशमन अधिकाऱ्यांची माहिती

प्रोपेन गॅस टाकी पूर्ण सुरक्षित मात्र मोठे प्लॅन्ट जळून खाक

पेट्रोलियमचे कच्चे पदार्थ असल्याने भडकत होती आग, फोमचा करावा लागत होता मारा

Pune Live : कस्पटे कुटुंबीयाला धमकवल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल

वैष्णवी यांचा मुलगा हगवणे याने निलेश याच्याकडे दिला होता तेव्हा निलेश ने त्याच्याकडील पिस्तूल कस्पटे कुटुंबीयावर रोखली होती त्यामुळे वारजे पोलिस ठाण्यात आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Nashik Live : नाशिक कुंभमेळ्यात शिवरायांच्या प्रतिमेस शाहीस्नान घालण्याची मागणी

नाशिक कुंभमेळ्यात शिवरायांच्या प्रतिमेस शाहीस्नान घालण्याची मागणी महिला आखाड्याच्या प्रमुख त्रिकाल भवंता सरस्वती महाराज यांनी केली आहे. तसेच महिला आखाडयासह शाही स्नानासाठी महिला आखाड्याला स्वतंत्र व्यवस्था करण्याची केली मागणी त्यांनी केली. गोदावरी नदीमुळे कुंभ होतो, त्यामुळे गोदावरी नदी प्रदूषण मुक्त झाली पाहिजे, असंही ते म्हणाले. पुणे हुंडाबळी प्रकरणावर प्रतिक्रिया देत कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली.

Pune Live : पुणे शहरात सकाळपासून पावसाची संतधार

पुणे शहरात पहाटेपासून पावसाची संतधार सुरु आहे. काल रात्री काही भागात मुसळधार पाऊस झाल्यानंतर आज सकाळपासून शहरात संतधार सुरू आहे. पुणे शहरात पुढील २ दिवस हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. 

Ajit Pawar Live : अजित पवार कसपटे कुटुंबीयांची भेट घेणार

उपमुख्यमंत्री अजित पवार आज संध्याकाळी कोल्हापूर दौरा पूर्ण करून पुण्यात दाखल होणार आहेत. पुण्यात आल्यानंतर ते आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी कसपटे कुटुंबीयांची भेट घेणार असून, ही भेट ही केवळ सांत्वनासाठी असेल. कसपटे कुटुंबीयांवर आलेल्या दुःखद प्रसंगानंतर अजित पवार त्यांना धीर देण्यासाठी आणि त्यांच्या सोबत सहवेदना व्यक्त करण्यासाठी ही भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

Nashik Live: नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणींसाठी १ जूनला मोठी घोषणा

नाशिकमध्ये येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग येणार असून, आगामी पर्वणींच्या शाही स्नानाच्या तारखा जाहीर करण्यासाठी अखेर १ जूनचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे. याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत १३ आखाड्यांच्या २६ प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी नाशिकमधील साधू, महंत आणि कुंभमेळ्यात सक्रिय भूमिका बजावणाऱ्या मंडळींचा सहभाग असणार आहे. या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याचं स्वरूप, शाही स्नानाच्या तारखा, तसेच या पर्वणीसाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचं नियोजन, वाहतुकीच्या सोयी आणि सुरक्षेची आखणी करण्यात येणार आहे. पर्वणीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर नाशिक महापालिका, पोलीस प्रशासन, पर्यटन विभाग आणि विविध सेवाभावी संस्थांच्या सहभागाने व्यापक नियोजन राबवले जाईल. त्यामुळे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनाची तयारी आता अधिक सुसंगतपणे होणार आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी सासरा व दिर पुणे शहर व इतर भागात फिरले

वैष्णवी हगवणे यांच्याशी संबंधित खळबळजनक प्रकरणात तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे हे पुणे शहरातील विविध ठिकाणी फिरत असल्याचे समोर आले आहे. पोलिस तपासात उघडकीस आले की हे दोघे आरोपी बावधनमधील मुहूर्त लॉन्स, कोल्हापूर, पवनानगर, तळेगाव आणि स्वारगेट परिसरात गेल्या काही दिवसांत फिरले होते. या हालचाली सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाल्या असून, पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा अधिक स्पष्ट केली असून, आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Ajit Pawar Live : वैष्णवी हगवणे प्रकरणात दोषींवर कडक कारवाईच्या सूचना, अजित पवार यांची माहिती

पिंपरीतील वैष्णवी हगवणे प्रकरणात आपला कसलाही संबंध नाही, दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Latur Live : रेणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, गावांना सतर्कतेचा इशारा

लातूर जिल्ह्याती पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावल्याने रेणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Pune Live : रुपाली चाकणकर आज कस्पटे कुटुंबियांची भेट घेणार

वैष्णवी हगवणे संशयास्पद मृत्यू प्रकरणात तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली आहे, दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज वैष्णवीचे वडील आणि नातेवाईंकांची भेट घेणार आहेत. यानंतर त्या पत्रकार परिषदेत माहिती देणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.