अजय देवगण ( Ajay Devgn) आणि रितेश देशमुख ( Riteish Deshmukh) यांचा 'रेड 2' (Raid 2) हा ॲक्शन आणि ड्रामा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन आता चार आठवडे झाले आहेत. 'रेड 2' 1 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे.'रेड 2' चित्रपटाचे आतापर्यंतचे कलेक्शन जाणून घेऊयात.
'रेड 2' चित्रपट देवगणचा पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'रेड 2'चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 95.75 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 40.6 कोटी रुपये, तिसऱ्या आठवड्यात 20.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट रिलीज होऊन आता एक महिना होणार आहे.
'2' चित्रपटाने रिलीजच्या 23 व्या दिवशी 1 कोटी कमाई केली आहे. आता पर्यंत चित्रपटाने जवळपास 'रेड 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील (ग्लोबल) कमाई 223.89 च्यावर केली आहे. तर नेट बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 161. 79चा व्यवसाय केला आहे.
'रेड 2' चित्रपटात अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत, रितेश देशमुखने खलनायकाची भूमिकेत झळकला आहे. त्यांच्या अभिनयाचे कौतुक देखील होत आहे. तर चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'रेड 2' चित्रपट राज कुमार गुप्ता दिग्दर्शित आहे. 'रेड 2'चित्रपटात बॉलिवूडचे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. यात वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला आणि सुप्रिया पाठक यांचा समावेश आहे.
'रेड 2' ओटीटी अपडेट'रेड 2' चित्रपट थिएटर गाजवल्यावर आता लवकरच ओटीटीवर पाहता येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'रेड 2' रिलीज होणार आहे. चित्रपट जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. चाहते 'रेड 2' घरबसल्या पाहण्यासाठी उत्सुक आहेत.