Maharashtra News Live Updates : संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन
Saam TV May 24, 2025 10:45 PM
गृहमंत्री अमित शाह यांची 26 मे रोजी नांदेडमध्ये सभा

देशाचे गृहमंत्री अमित शहा हे 26 मे रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात नवा मोंढा मैदानावर सांयकाळी भव्य सभा आयोजीत करण्यात आली आहे. या सभेत अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. या सभास्थळाची खासदार अशोक चव्हाण यांनी पाहणी केली. सभेसाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांची सभा विक्रमी व्हावी यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केलीय.

संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यावर बंदी घालण्याची मागणी करणार्या संभाजी भिडे यांच्या विरोधात आज अकलूज येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जोडोमारो आंदोलन करण्यात आले.

अकलूज येथील चौकात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज बांधवांनी संभाजी भिडे यांच्या प्रतिकात्मक फोटोला पायदळी तुडवून जोडे मारले. यावेळी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी ही  केली.

Jalna: जालन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उन्हाळी बाजरी पिकाचे नुकसान

जालन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उन्हाळी बाजरी पिक आडव पडून नुकसान झालं आहे.

जालन्यातील मंठा तालुक्यातील तळणी शिवारात मान्सूनपूर्व पावसाचा उन्हाळी बाजरी पिकांना फटका बसला आहे.

मागील दहा ते बारा दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस बरसतो आहे. या पावसामुळे फळबागासह कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

दहा दिवसापासून मंठा तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस पडतोय.जालन्यातील मंठा तालुक्यातील तळणी शिवारातील उन्हाळी बाजरी पिकाचे नुकसान झाले आहे.

दरम्यान जालना जिल्हा पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे..

Maharashtra Politics: शरद पवार गटाला धक्का, सत्यजीत पाटणकर भाजपाच्या वाटेवर

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र

पाटण विधानसभा मतदार संघातील मंत्री शंभुराज देसाई यांचे प्रतिस्पर्धी

सोमवारी पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक

तीन दिवसात उजनी धरणाच्या पाणी साठ्यात पावणेदोन टीएमसीने वाढ

पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर साठी जीवनदायीने ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये पावसाच्या पाण्यामुळे वाढ झाली आहे

गेल्या तीन दिवसात उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार राहिलेली आहे आणि यामुळे गेल्या तीन दिवसात उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये 1 पूर्णांक 89 टीएमसी इतका पाणीसाठा वाढला आहे.

सध्या उजनी धरणामध्ये एकूण 53 पूर्णांक 25 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. उजनी धरण हे आजच्या स्थितीला मायनस 19. पूर्णांक 43 टक्के इतका आहे. मायनस मध्ये असलेलं उजनी धरण प्लस मध्ये येण्यासाठी आणखी 10 पूर्णांक 41 टीएमसी इतकी पाण्याची आवश्यकता आहे.

जळगाव जिल्ह्यात तुर खरेदीसाठी मुदतवाढ, नाफेडच्या माध्यमातून १६ केंद्रांवर सुरू राहणार खरेदी प्रक्रिया

खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमतीवर सुरू असलेल्या तुर खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, ही खरेदी आता २८ मे २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील १६ खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी सादर करता येणार आहे.

नाफेडच्या माध्यमातून जिल्ह्यात अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव येथे ही खरेदी सुरू आहे. आधारभूत किंमतप्रमाणे तुर खरेदीचा दर रु. ७५५०/- प्रति क्विंटल इतका निश्चित करण्यात आला आहे. या मुदतवाढीचा शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन उपाध्यक्ष रोहित निकम, संचालक संजय पवार यांनी केले आहे.

निलेश चव्हाण आज पुणे पोलिसांना सरेंडर करणार - सूत्रांची माहिती

निलेश चव्हाण चा भाऊ, आणि वडील यांची कर्वेनगर पोलीस चौकी मध्ये चौकशी...

राजेंद्र हगवणे आणि कुटुंबीयांशी नेमके निलेश चव्हाण चे संबंध काय??

हगवणे कुटुंबियांशी निलेश चव्हाणशी केव्हापासून ओळख??

वैष्णवी हगवणे चे बाळ निलेश चव्हाणकडे कोणा मार्फत देण्यात आले??

हे बाळ निलेश चव्हाण कडे किती वेळ होते आणि पुढे त्याने कोणाकडे दिले ..

हगवणे कुटुंबियांचे आणि निलेश चव्हाण चे काही आर्थिक संबंध आहेत का?

याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरु आहे

कस्पटे कुटुंबीय बाळाचा ताबा घेण्यासाठी आले होते तेव्हा निलेश चव्हाणने बंदुकीचा धाक दाखवला या यावेळी निलेश चव्हाणचे कुटुंबे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते या घटनेचे ते साक्षीदार असल्यामुळे त्यांची चौकशी सुरु आहे.

दिल्ली ते पुणे एअर इंडिया च्या प्रवासादरम्यान विमानात महिलेचे तीन लाख 85 हजार रुपये चोरट्याने चोरले

दिल्ली -पुणे विमान प्रवासादरम्यान महिलेने सॅक मध्ये ठेवलेली पर्स आणि त्यामधील सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरट्याने केली चोरी..

या प्रकरणी आता विमानतळ पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला..

चोरटे आता थेट विमानात प्रवास दरम्यान प्रवाशाची चोरी केल्याने खळबळ..

कोकणातील पर्यटन व्यवसायाला पावसामुळे ब्रेक, सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी होडी वाहतूक बंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल पर्यटन तेजीत असतं. मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात दाखल होतात. मात्र 20 मे पासूनच पावसाला सुरुवात झाल्याने कोकणातील पर्यटनाला पूर्णपणे ब्रेक लागला असून पर्यटन व्यवसाय पूर्णपणे थांबला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी होळी वाहतूक सुद्धा बंद ठेवण्यात आली आहे.

शहीद जवान संदिप गायकर यांच्या अंत्य दर्शनासाठी लोटला जनसागर

कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला...

भारत माता की जय.. शहीद जवान संदिप गायकर अमर रहे च्या घोषणांनी परिसर दुमदुमला...

राष्ट्रध्वज स्वीकारताना संदिप यांच्या पत्नी दिपा यांनी दिल्या भारत माता की जय च्या घोषणा...

निलेश चव्हाणच्या भावाला आणि वडिलांना वारजे पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात

कस्पटे कुटुंबियांना धमकवणाऱ्या निलेश चव्हाण च्या भावाला आणि वडिलांना वारजे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

निलेश चव्हाणने कस्पटे कुटुंबीयांना ज्या बंदुकीने धाक दाखवला होता त्या बंदुकीचा देखील शोध सुरू निलेश चव्हाण फरारी फरारी असल्याची माहिती

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी चांदूरबाजार महामार्गावर दोन गाड्यांचा भीषण अपघात

दोन वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू..

अष्टगाव ते खानापूरच्या दरम्यान कोंबड्या घेऊन जाणारे दोन पिकप वाहनांची समोरासमोर जबर धडक..

या अपघातातील जखमींना तातडीने मोर्शी रुग्णालयात हलवले..

शहीद जवान संदिप गायकर यांचा अंत्यविधी सुरू

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अंत्यविधीसाठी उपस्थित...

अहिल्यानगर पोलिस दल आणि लष्कराकडून संदिप गायकर यांना मानवंदना...

वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी लोटला जनसागर...

ब्राम्हणवाडा गावातील ज्या सह्याद्री विद्यालयात संदिपने शिक्षण घेतले त्याच विद्यालयाच्या मैदानावर अंत्यविधी सुरू...

सुआश्रु नयनांनी शहीद जवानाला दिला जातोय अखेरचा निरोप...

जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत संदिप गायकर यांना वीरमरण...

संदिप यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दिड वर्षाचा मुलगा आणि दोन बहिणी...

Solapur: सोलापूरच्या शास्त्री नगर भागातील नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यास घातला घेरावा

पावसामुळे ड्रेनेज लाईनचे घाण पाणी घरात येत असल्याने नागरिकांना घातला घेरावा

ड्रेनेजच्या या घाण पाण्यामुळे घरातील लोक आजारी पडत असल्याने नागरिकांनी केला संताप व्यक्त

वारंवार पालिकेचा अधिकाऱ्यांना सांगून देखील या तक्रारीकडे करण्यात आले दुर्लक्ष

जळगाव जिल्ह्यात बोगस खत व बियाणं विक्री तसेच दुकानात टोल फ्री क्रमांक न लावल्यास कृषी केंद्र चालकांचा परवाना होणार रद्द

खबरदार अवैध तसेच बोगस खत व बियाणं विक्री केली किंवा तसे आढळून आल्यास त्याचप्रमाणे कृषी केंद्र दुकानांवर शासनाने ठरवून दिलेली नियमावलीचा फलक तसेच टोल फ्री क्रमांक न लावल्यास कृषी केंद्र चालकांचा परवाना रद्द करण्यात येईल अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

जळगाव जिल्हा महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश सिमेलगत असलेल्या जळगाव जिल्ह्यात अवैधपद्धतीने मोठ्या पद्धतीने बनावट बोगस बियाणे खते आल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असल्याकारणामुळे जिल्हाधिकारी यांनी जिल्हाभरातील सर्व कृषी केंद्र चालक यांच्यासोबत आज आढावा बैठक घेतली. बियाणं तसेच खत खरेदी केल्याबद्दल शेतकऱ्यांनी सुद्धा पक्क बिल घ्यावं जे कृषी केंद्र चालक पक्क बिल देणार नाहीत बिल देण्यात दुर्लक्ष तसेच टाळाटाळ करतील त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.

उदय सामंतकोयना वॉटरस्पोर्ट्स सारखा कार्यक्रम आमच्याकडे देखील घ्यावा रामदास भाईंनी विरोधी पक्षनेते पदाचा एक वेगळा दरारा त्यावेळी निर्माण केला होता - शंभूराज देसाई

रामदास भाईंनी विरोधी पक्षनेते पदाचा एक वेगळा दरारा त्यावेळी निर्माण केला होता - शंभूराज देसाई

आम्हाला त्यावेळी खूप काही शिकायला मिळालं -

योगेश कदम यांनी आपला सेन्सेटिव्ह विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला आहे - शंभूराज देसाई

योगेश कदम पहिल्या टर्मचे ते मंत्री आहेत असं वाटतंच नाहीत - देसाई

चिंचघर गावाला निसर्ग सौंदर्य आहे, पर्यटन विकासाच्या दृष्टीने पर्यटन विभागामार्फत 1 कोटी रुपयांचा निधी तात्काळ दिला जाईल

मध्यरात्री पुणे पोलिसांकडून निलेश चव्हाण यांच्या घरावर छापेमारी

छापेमारीत निलेश चव्हाण चा लॅपटॉप पुणे पोलिसांनी केला जप्त

पुणे पोलिसांकडून निलेश चव्हाण याला पोलीस स्टेशनला हजर राहण्याची देखील नोटीस

लॅपटॉप सह इतर काही वस्तू पुणे पोलिसांनी छापे मारीत केल्या जप्त

वैष्णवी हगवणे प्रकरणात तिचं लहान बाळ निलेश चव्हाण याच्याकडे ठेवल्याचा आरोप कस्पटे परिवाराने केला होता

याच प्रकरणी पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी काल रात्री उशिरा निलेश चव्हाणच्या घरावर केली छापेमारी

बीड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम शेतीची आंतरमशागतीची कामे रखडली

बीड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम पावसाने शेतीची अंतर मशागतीची कामे रखडली...

अवकाळी पावसाने बीड जिल्ह्यातील शेतीची अंतर मशागतीची कामे रखडली काढली...

बीड जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम असल्याचा पाहायला मिळत आहे रात्रभर जिल्हाभरात रिमझिम पाऊस...

भाजीपाला, फळबागा सह कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

खतांची लिंकिग केल्यास कंपन्या, विक्रेत्यांवर कारवाई जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचा इशारा

शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच त्यांना खते पुरवावीत,कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही विशिष्ट खतासोबत इतर खते करण्याची सक्ती करु नये,लिंकिग करणार्या कोणत्याही कंपन्या व खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी कंपन्यांचे प्रतिनिधी व खत विक्रेत्यांना दिले आहेत.तसेच शेतकऱ्यांना एमआरपी पेक्षा जास्त दराने खत विक्री करु नये अस जिल्हाधिकारी यांनी सांगितले शेतकऱ्यांना दर व इतर तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मंगल कलश यात्रेचा महाडमध्ये समारोप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मंगल कलश यात्रेचा समारोप महाडच्या चांदे क्रिडांगण येथे झाला. यावेळी महाराष्ट्राचे कलावैभव, संस्कृती यांचे दर्शन घडवणाऱ्या विविध कार्यक्रमाचे सादरीकरण सिने सृष्टीतील प्रतिथयश कलाकारांनी केले. यात शिवराज्याभिषेकाचा देखावा रसिक प्रेक्षकांची मनं जिंकून गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, आनंद परांजपे, माजी आमदार अनिकेत तटकरे आदीनी देखील कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

हिंगोलीच्या वसमतमध्ये पावसात निघाली तिरंगा रॅली

भारतीय सेनेने सीमेवर ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानानात घुसून यशस्वी कामगिरी राबवल्या नंतर देशभरात भारतीय जनता पार्टी कडून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे, आज हिंगोलीच्या वसमत शहरात भर पावसात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हातात छत्र्या घेत या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेतला होता यावेळी नागरिकांनी देखील तिरंगा ध्वज हातात घेत शेकडोंच्या संख्येने हजेरी लावली होती,या वेळी देशभक्तीपर गीते गात ही रॅली पावसामध्येच

शहरातील विविध भागांमध्ये पोहोचली होती

बीडमध्ये शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागरांकडून अजित पवारांचे आभार व्यक्त करणारे बॅनर

उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत. चार दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीचे बैठक घेतली. या बैठकीतून जिल्ह्यातील अनेक विषयांसह शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या मागण्या देखील पूर्ण करण्यात आल्यात. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांचे आभार मानणारे बॅनर लावल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा रंगु लागली आहे. सध्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन आमदार असून शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे एकमेव आमदार आहेत.

Ratnagiri: रत्नागिरीत समुद्र किनाऱ्यावर लाटांचा तडाखा

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोसळधारा पहायला मिळताय मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढलेय वेगवान वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झालेय. वेगवान वा-यामुळे समुद्र चांगलाच खवळलाय.वेगवान लाटांचा तडाखा सध्या समुद्र किनारपट्टी भागात पहायला मिळतोय. उंचच्या उंच लाटा या किना-यावर आदळताय.पुढचे 48 तास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय.जिल्हा प्रशासनानं नागरीकांना सतर्कतेचा इशारा देखील दिलाय

कणकवली आचरा रस्त्याचे काम पावसामुळे रखडले रस्ता वाहतुकीस बंद

कणकवली आचरा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे या मार्गावरील वरवडे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

त्यामुळे आता आचरा ते कणकवली येथे येण्या जाण्यासाठी कलमठ कुंभारवाडी मार्गे जावे लागणार आहे.

त्यासाठी वाहन चालकांना चार किलोमीटरचा वळसा घालून जावे लागणार आहे.

यंदा पावसाळ्यापूर्वी वरवडे येथील पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम अपूर्ण स्थितीत राहिले आहे.

गेले सहा महिने वरवडे येथील जुना पूल तोडून तेथे नवीन पुलाची उभारणी केली जात होती. त्यासाठी नदीपात्रातून रस्ता काढण्यात आला होता गेले चार दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता वाहून गेला आहे.

तर वरवडे पूल अपूर्ण असल्याने येथील वाहतुकीचा मार्ग सध्या बंद झाला आहे.

शहीद जवान संदीप गायकर यांचे पार्थिव निवासस्थानी दाखल

पार्थिव दाखल होताच आई वडील आणि पत्नी तसेच नातेवाईकांचा आक्रोश...

वीर जवान संदीप यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी...

काही वेळात अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील सह्याद्री विद्यालयाच्या मैदानात होणार लष्करी इतमामात अंत्यसंस्कार...

ग्राम प्रशिक्षणा झाल्यानंतर दिला जाणार अखेरचा निरोप...

पंचक्रोशीतील सर्व गावे कडकडीत बंद...

शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी उसळला जनसागर...

अवकाळी पावसामुळे जळगाव जामोद तालुक्यात शेती पिकांचे नुकसान

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे जळगाव जामोद तालुका परिसरातील रब्बी व उन्हाळी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे... या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना सरसकट आर्थिक द्यावी या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे.... अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत मिळणे बाबत जळगाव जामोद तहसीलदार यांचे मार्फत राज्याच्या कृषिमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.....

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 99.5 मीमी पावसाची नोंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 99.5 मीमी पावसाची नोंद झाली आहे. आजही पावसाची संततधार रीपरीप सुरूच असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मागील 24 तासात सावंतवाडी 102 मिमी, कणकवली 112 मिमी, देवगड 106 मिमी, कुडाळ 114 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 167 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

भाजपचे माजी मंत्री जगदीश गुप्ता हे शिंदे गटाच्या वाटेवर?

अमरावतीचे भाजपचे नेते माजी मंत्री जगदीश गुप्ता हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे...लवकरच त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा सुद्धा आहे, जगदीश गुप्ता हे अमरावती विधानसभेचे दोन वेळा आमदार व एक वेळा विधान परिषदेचे आमदार होते, झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती, अमरावती महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे या निवडणुकीत जगदीश गुप्ता यांची भूमिका निर्णायक असणार असून जगदीश गुप्ता शिंदे सेनेत गेले तर शिंदे गट अमरावती शहरात मजबूत होणार आहे तर भाजपचे मात्र प्रचंड या ठिकाणी नुकसान होऊ शकते.. जगदीश गुप्ता यांच्यासोबत हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचा एक मोठा गट असून याचा फटका अमरावती महानगरपालिकेत भाजपला बसणार आहे

अवकाळी पावसाचा मोहोळ तालुक्याला मोठा फटका, अनेक शेतात सर्वत्र पाणीच पाणी

- सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाची दमदार हजेरी

- मोहोळ तालुक्यात अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान

- मोहोळ तालुक्यातील पापरी, खंडाळी, येवती , आष्टी , तेलंगवाडी या पाच गावातील अंदाजे 162 हेक्टरवरील पिकांचे फळबागांचे नुकसान

- कृषी विभागाच्या वतीने पंचनामे सुरू मात्र लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

कामगारांची लूट करणाऱ्या दलालाच्या १२ तासाच्या आत पोलिसांनी मुसक्या अवळल्या

साम टीव्हीच्या बातमीचा दणका. छत्रपती संभाजीनगरमध्ये कामगारांची लूट करणाऱ्या दलालाच्या १२ तासाच्या आत पोलिसांनी मुसक्या अवळल्यात. साम टीव्हीवर काल सकाळी १० वाजता बातमी लागल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी या हे प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात येताच तातडीने कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आलीय. आणखी दोघांचा शोध सुरू आहे. कामगार कल्याण विभागाची किट मिळवून देतो म्हणून बाराशे ते पंधराशे रुपये घेणाऱ्या आणि पैसे मागणाऱ्या तिघाजणांवर दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफसर अकबर शेख वय 42 राहणार आंबेलोहळ छत्रपती संभाजीनगर यास अटक करण्यात आलेली आहे. तर राजु शहा राहणार पैठण आणि एक अनोळखी महिला या दोघांचा शोध सुरू आहे. भीती दाखवून पैसे वसूल करणे, खंडणी वसूल करणे, कामगारांची फसवणूक करणे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनातर्फे बांधकाम मजुरीसाठी संसार उपयोगी किट मिळवून देण्यासाठी बांधकाम मजुरांकडून पैशाचे मागणी करून पैसे स्वीकारल्याचे व पैसे न दिल्यास संसार उपयोगी किट मिळणार नाही अशी भीती कामगारांच्या मनात घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने व महाराष्ट्र शासनातर्फे बांधकाम मजुरांसाठी मोफत संसार किट मिळत असल्याचे माहिती असताना सुद्धा कामगारांकडून खंडणी घेतली व कामगारांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आवास येथे पूर्ववैमनस्यातून एकाचा खून , तिघे गंभीर जखमी

अलिबाग तालुक्यातील आवास येथे एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. धर्मेंद्र म्हात्रे असे मृताचे नाव आहे. जखमींवर अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी एकाच कुटुंबातील पाच जणांना अटक केली असून त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तुकडोजी महाराजांच्या आश्रमात चंदन तस्करांचा धुमाकूळ

चंदनाची झाडे कापून त्यातील गाभा लंपास करण्याच्या उद्देशाने अज्ञात चंदन तस्करांनी गुरुकुंज आश्रमातील चंदनाच्या झाडांना लक्ष करून रात्रीच्या काळोखात चंदनाच्या झाडातील गाभा काढण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमातील मध्यवर्ती कार्यालयाच्या परीसरात लावण्यात आलेल्या सहा ते सात चंदनाच्या झाडांपैकी तीन झाडांना चंदन तस्करांनी लक्ष करीत आरी व कटरने कापन्या मारल्या आहे. व यातील एका झाडाला कटरच्या साहाय्याने कापून यातील गाभा काढून नेण्यात आला आहे,अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, यांनी स्थापित केलेला अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ सेवाभावी सस्था व आश्रम असून या आश्रमिय परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. यातच सहा ते सात चंदनाच्या झाडांची सुद्धा लागवड करण्यात आली आहे त्यातीलच एका चंदनाच्या झाडांना तस्करांकडून कटरमशीनने कापून त्यातील गाभा काढून नेण्यात आला,

MD ड्रग्स तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे... 16.36 ग्राम वजनाचे एमडी ड्रग्स जप्त करत पोलिसांनी ही,कारवाई केली आहे. तर या कारवाईत एका महिलेसह चार जनाविरुद्ध लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... लातूर शहरातल्या खाजगी कोचिंग क्लासेस परिसरात 2 व्यक्ती ड्रग्सची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती... दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या व्यक्तींवर छापा टाकत त्यांना ताब्यात घेतल, यावेळी या रॅकेटमध्ये एका महिलेसह इतर दोघांचा समावेश असल्याचं समोर आलं .. त्यापैकी एक आरोपी फरार असल्याने त्याचा तपास आता पोलीस घेत आहेत... मात्र लातूर सारख्या शैक्षणिक शहरात अशाप्रकारे ड्रग्स तस्करी करताना सापडण, ही खूप धक्कादायक बाब असल्याचं बोलले जात आहे...

राज्यात करोनाचे आणखी ४५ रुग्ण, मुंबईत सर्वाधिक ३५ जणांना संसर्ग

राज्यातील करोना रुग्णसंख्येत वाढ सुरू असून, गेल्या २४ तासांत आणखी ४५ रुग्ण आढळले आहेत. राज्यात सर्वाधिक ३५ रुग्ण मुंबईत असून, पुण्यातही ४ जणांना संसर्ग झालेला आहे. या महिन्यात करोनाचे एकूण १७७ रुग्ण आढळले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत

अजित पवार यांच्या हस्ते नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. तसेच बोरी येथे 33 केव्ही क्षमतेच्या सबस्टेशनचे भूमिपूजनही त्यांच्याच हस्ते होणार आहे.याशिवाय, श्रीक्षेत्र ओतूर येथे आयोजित जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आणि सदैव वैकुंठ गमन सांगता सोहळ्यालाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राहणार आहे.

नागपुरात दोन ठिकाणी ED चे छापे....शुक्रवारी दिवसभा चालली कारवाई...

नागपूरच्या इतवारी परिसरात सागर ज्वेलर्स येथे ईडीची रेड.

सराफा असोसिएशनचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांच्या सागर ज्वेलर्स येथे ईडीची टीमकडुन शुक्रवारी दिवसभर ही कारवाई चालली...

यापूर्वी 18 कोटी रुपयांचे सोने तस्करी प्रकरणात याआधी डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सकडून आधीच प्रकरण दाखल असून फेमा अंतर्गत चौकशी सुरू आहे.

कावळे यांना अलीकडे काही महिने तुरुंगवारी सुद्धा झाली होती...

त्याच प्रमाणे कॅश हवाला कारोबारी शैलेश लखोटिया यांच्याकडे देखील ED ची रेड.

बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आणखी एका अधिकाऱ्याला अटक

* नागपूर शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालक आणि संभाजी नगर विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक करण्यात आली आहे..

* वैशाली जामदार या २०२१_२३ या कालावधीत नागपूर शिक्षण विभागाच्या उपसंचालक होत्या.२०१९ पासून बोगस शालार्थ आयडी जारी झाल्याची बाब आतापर्यंतच्या चौकशीत समोर आली आहे..

* वैशाली जामदार यांच्या कार्यकाळात २११ बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्या होत्या..त्या सध्या संभाजी नगर येथे कार्यरत आहेत..

* त्यांना पोलिसांनी चौकशीला या आधी बोलविले होते..मात्र दहावी बारावीच्या निकालाचे कारण देत त्यांनी नागपुरात यायचे टाळले होते..

* या प्रकरणात एसआयटी गठित केल्यावर तपासाला वेग आला आहे. सहायक पोलिस आयुक्त सुनीता मेश्राम यांच्या नेतृत्वातील एसआयटीकडे रोज रॅकेट बाबत माहिती येत आहे.. त्यामुळे अजून काही अधिकाऱ्यावर गदा येण्याची शक्यता आहे

डोंबिवली एमआयडीसी परिसरात घरफोडी, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील सुदाम नगर येथील साईदीप सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा दोन बंद फ्लॅटमध्ये घरफोडी केल्याची घटना घडली . हे दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. यामधील एका चोरट्याच्या हातात कोयता दिसून येतोय . या चोरट्यानी मौल्यवान दागिने व ऐवज लंपास केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेच्या आधारे या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे

अंबरनाथ पोलिसांना अंमली पदार्थ विक्रीची माहिती कशी नव्हती?

अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रीवर छापेमारी करून अंमली पदार्थ जप्त केले. मात्र या ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती इतके दिवस पोलिसांना कशी नव्हती? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी विचारला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात 3,396 मेट्रिक टनने वाढ

ड्रोन सर्वेक्षण, अवैध मासेमारीवरील कडक कारवाई आणि दिवस रात्र गस्त यामुळे यावर्षीच्या मत्स्य उत्पादनात 3,396 मेट्रिक टनने वाढ झाली आहे. संपत आलेल्या सन 2024-25 या मत्स्य वर्षात रत्नागिरी जिल्ह्याचे मत्स्योत्पादन 71,303 मेट्रिक टन एवढे झाले आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे मत्स्य उत्पादनातील हे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. सन 2023-24 मध्ये जिल्ह्याचे सागरी मत्स्योत्पान 67,907 मेट्रिक टन होते. तर सन 2024-25 मध्ये जिल्ह्याच्या सागरी मत्स्योत्पादनामध्ये 3,396 मे. टनने वाढ झाली असून हे मत्स्योत्पादन 71,303 मे. टन एवढे झाले आहे.

यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस,हवामान विभागाचा अंदाज सतर्कतेचा इशारा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून यामुळे यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय नैसर्गिक आपत्ती विभाग संपूर्ण प्रक्रियेवर नजन ठेवून आहे. जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.यातच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय यामुळे शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार अंदाज वरती यात आला आहे.

यवतेश्वर घाटात कोसळली दरड, घाटातून एकेरी वाहतूक सुरू

सातारा जिल्ह्यात अद्याप पावसाची रिप रिप सुरूच आहे.त्यामुळे जिल्ह्यातील घाटरस्ते आता धोकादायक बनू लागले आहेत. सातारा कडून कास पठार कडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री उशिरा दरड कोसळली आहे.रात्री उशिरा ही दरड कोसळल्याने अद्याप या ठिकाणी प्रशासन पोहोचू शकले नाहीये.सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असून वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.या घाटातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ सुरू असते कास,बामणोली तसेच अनेक गावानं जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने पर्यटक आणि प्रवासी या मार्गाचा सर्रास वापर करत असतात.त्यामुळे आता घाट माथ्यावरून प्रवास करताना वाहन धारकांना सतर्क राहावे लागणार आहे.

जुनी पेन्शन बाबत सीईओनी काढला आदेश

जुनी पेन्शन योजना लागू करा या एकाच मागणीसाठी तब्बल गेल्या वीस वर्षांपासून प्रशासनाशी भिडलेल्या कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळाले आहे.2005 नंतर नोकरीत रुजू झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील 46 शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.त्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीधिकारी मंदार पत्की यांनी आदेश जारी केलाय.

यवतमाळ महसूल विभागात प्रशासकीय बदल्या

भूतकाचे नाव यवतमाळ महसूल विभागातही बदली सत्र सुरू झाले आहे. सहाय्यक महसूल अधिकारी,महसूल सहाय्यक तसेच वाहनचालक अशा जवळपास 47 कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. जिल्हा परिषद, पोलीस विभागानंतर आता महसूल विभागातही बदली प्रक्रियेला वेग आलाय.जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बदलीपात्र कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत बदली प्रक्रिया पूर्ण केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील 16 सहायक महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या शिवाय 28 महसूल सहाय्यक तसेच तीन वाहन चालकाच्याही प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.