महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजीत पाटणकर हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सोमवारी पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पुढील राजकीय निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
राज्यातील महापालिका निवडणुका पुढील ४ महिन्यांत घेण्यात यावे, असे महत्त्वापूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, प्रत्येक नेता आगामी निवडणुकांसाठी तयारी लागला आहे.
कुठे फोडाफोडीचं राजकारण तर, कुठे नेते मंडळी स्वेच्छेने पक्षाला रामराम ठोकत आहेत. अशातच भाजपने गटाला मोठा धक्का दिला आहे.
सत्यजीत पाटणकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. पाटणकर भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
सत्यजीत पाटणकर हे पाटण विधानसभा मतदारसंघात प्रमुख चेहरा मानले जात होते. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मंत्री शंभुराज देसाई करीत आहेत. पाटणकरांच्या पक्षप्रवेशामुळे देसाई यांना स्थानिक पातळीवर आतील आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र पाटणकरांच्या पक्षप्रवेशामुळे भाजप आणखी बळकट होणार, असा अंदाज वर्तवला जात आहे.
पाटणकर गटाने सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील राजकीय निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपशी युती, थेट प्रवेश किंवा स्वतंत्र निर्णय, यावर बैठकीत अंतिम चर्चा होणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.