Maharashtra Live Updates : आमदार संदीप क्षीरसागरांकडून अजित पवारांचे आभार व्यक्त करणारे बॅनर
Sarkarnama May 24, 2025 07:45 PM
आमदार संदीप क्षीरसागरांकडून अजित पवारांचे आभार व्यक्त करणारे बॅनर

उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांचे आभार मानणारे बॅनर लावले आहे. पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन बैठकीत संदीप क्षीरसागर यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्या अजितदादांनी पूर्ण केल्या. त्यामुळे क्षीरसागर यांनी बॅनर लावत अजितदादांचे आभार मानले. मात्र हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

मंत्री छगन भुजबळ यांना मिळाला सातपुडा बंगला

नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना सातपुडा बंगला मिळाला आहे. धनंजय मुंडें यांच्या खात्यानंतर त्यांचे दालन आणि आता त्यांचा बंगला देखील भुजबळांना यांना मिळाला आहे.

निलेश चव्हाणच्या घरी पोलिसांचा छापा

वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचे बाळ तिच्या आई वडिलांकडे देण्यास नकार देणाऱ्या तसेच बंदूकीचा धाक दाखवणाऱ्या निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झाला आहे. निलेश चव्हाण हा फरार असून त्याच्या कर्वेनगरमधील घरी पोलिसांनी छापा टाकला आहे.

पुण्याच्या खराडीत बनावट कॉल सेंटर पोलिसांचा छापा

पुण्यातील खराडीमधील बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या छापा टाकला. तब्बल 150 ते 200 पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊनही कारवाई करण्यात आली.अमेरिकेमधील लोकांना फसून डिजिटल अटक करत त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. यातील मुख्य आरोपी हा गुजरात असल्याचे देखील समोर आले आहे.

ऑपरेशन सिंदूरसाठी शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अमेरिकेला रवाना

ऑपरेशन सिंदूरसाठी शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अमेरिकेला रवाना झाले. शशी थरूर यांनी 'एक्स' (माजी ट्विटर) वर एक व्हिडिओ शेअर करत म्हटले, "आम्ही जगाला दाखवू की भारत दहशतवादापासून घाबरत नाही. आम्ही शांत बसणार नाही आणि सत्य बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही. हा मिशन शांतीचा आहे. या मिशनद्वारे आम्ही जगाला हे पटवून देऊ की भारत शांतीच्या मार्गावर चालत आहे आणि दहशतवादाचा तीव्र निषेध करतो."

निलेश चव्हाणला अटक होणार

वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचे बाळ तिच्या आई वडिलांकडे देण्यास नकार देणाऱ्या तसेच त्यांना बंदूकीचा धाक दाखवणाऱ्या निलेश चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांची दोन पथके त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी त्याला अटक होणार आहे.

Vaishnavi Hagawane : वैष्णवीला लग्नात दिलेले 51 तोळे सोने बँकेत गहाण

वैष्णवीला लग्नात दिलेले 51 तोळे सोने हगवणे कुटुंबियांनी फेडरेल बँकेत गहाण ठेवल्याची माहिती समोर आल आहे. वैष्णवीच्या कुटुंबियांनी तिला हुंड्यात 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी दिली होती. हेच सोनं बँकेत गहाण ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आज जुन्नर दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. तसंच श्रीक्षेत्र ओतूर येथे आयोजित जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आणि सदैव वैकुंठ गमन सांगता सोहळ्यालाही ते आज उपस्थिती लावणार आहेत.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींसाठी आदिवासी विकास विभागाच्या निधीला कात्री

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे सरकारकडून आता विविध विभागाच्या निधीला कात्री लावण्याचा धडाका सुरू आहे. अशातच आता लाडक्या बहिणीसाठी आदिवासी विकास विभागाचा 335 कोटींचा निधी वळवण्यात आलेला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.

Sindhudurg Rain Updates: कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढल्यामुळे कोकण किनारपट्टीवर हवामान विभागाने अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे.

Vaishnavi Hagawane : पोलिसांचा हलगर्जीपणा असेल तर कारवाई करु

वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तिच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या सासरच्या लोकांवर कडक कारवाई करावी अशी राज्यभरातून मागणी केली जात आहे. वैष्णवीच्या सासऱ्याला आणि दीराला सात दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. अशातच आता मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणात पोलिसांनी काही हलगर्जीपणा केला असेल तर त्यांच्यावरही कारवाई कली जाईल असं म्हटलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.