कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी भाविकांनी केवळ दोन महिन्यांत तब्बल दोन कोटी सहा लाख सव्वीस हजार आठशे एकवीस रुपयांचे दान दिले आहे. मार्चच्या अखेरीस यापूर्वी दानपेट्या उघडण्यात आल्या होत्या. एप्रिल व मे महिन्यात उन्हाळी सुटीत देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी देवीच्या चरणी भरभरून दान दिले.
मंदिर परिसरातील दहा दानपेट्या सोमवारी (ता. १९) उघडण्यात आल्या. गेली चार दिवस या दहा दानपेट्यांतील मोजदाद सुरू होती. सर्वाधिक देणगी मदत पेटी क्रमांक दोन मध्ये ७२ लाख ९ हजार २२९ रुपयांची संकलित झाली आहे.
भाविकांनी दिलेले दान असे
पेटी क्रं. १ ः ५१ लाख ४० हजार ८४३
पेटी क्रं. २ ः ७२ लाख ९ हजार २२९
पेटी क्रं. ३ ः ६ लाख ७९ हजार ९२१
पेटी क्रं. ४ ः २ लाख ९१ हजार २०९
पेटी क्रं. ५ ः १ लाख ८६ हजार २१३
पेटी क्रं. ६ ः ३ लाख ७ हजार ६९८
पेटी क्रं. ७ ः ४५ लाख ५१ हजार ५७२
पेटी क्रं. ८ ः ४ लाख ३७ हजार ५९७
पेटी क्रं. ११ ः १४ लाख ३० हजार ४४२
पेटी क्रं. १२ ः ३ लाख ९२ हजार ९६
...
एकूण ः २ कोटी ६ लाख २६ हजार ८२१
भरपावसातही भाविकांची अंबाबाई मंदिरात गर्दी
गेले काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातही पावसाची संततधार सुरू आहे. तसेच उन्हाळी सुट्याही संपत आल्या आहेत. सुट्याची पर्वणी साधत भाविकांनी संततधार पावसातही मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. शुक्रवारी (ता. २३) ६९ हजार १०६ भाविकांनी दर्शन घेतले. दरम्यान, पावसापासून बचाव होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने परिसरात पत्र्याचे शेड उभारले आहे.