Morning Breakfast recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा 'बटाटा मटर ब्रेड कचोरी', सोपी आहे रेसिपी
esakal May 25, 2025 09:45 PM

Step-by-step bread kachori recipe for beginners: तुम्हाला एकाच प्रकारची कटोरी खाऊन कंटाळा आला असेल तर सकाळी नाश्त्यात 'बटाटा मटर ब्रेड कचोरी' बनवू शकता. 'बटाटा मटर ब्रेड कचोरी' बनवणे खुप सोपे असून चवदार देखील आहे. तसेच कमी वेळेत तयार होते. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पदार्थ आवडेल. चला तर मग जाणून घेऊया 'बटाटा मटर ब्रेड कचोरी' कशी बनवायची आणि बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते.

बटाटा मटर ब्रेड कचोरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

तेल - १ टेबलस्पून
जिरे - १ टीस्पून
हिंग - १ टीस्पून
हिरव्या मिरच्यांची पेस्ट - १ टीस्पून
मटर - १/३ कप
उकडलेले बटाटे - १ कप
हळद पावडर - १ टीस्पून
लाल मिरची पावडर - १ टीस्पून धणे
पावडर - १ टीस्पून
गरम मसाला - १ टीस्पून
ब्रेड क्रंब्स
कॉर्न फ्लोअर स्लरी
ब्रेड

बटाटा मटर ब्रेड कचोरी बनवण्याची कृती

सर्वात आधी कढई गरम करून त्यात तेल टाका. नंतर त्यात जिरं, आलं-हिरवी मिरची पेस्ट,मटार,धणे पावडर, लाल तिखट,हळद, गरम मसाला, मीठ टाका आणि चांगले मिसळा. नंतर उकडलेले बटाटे टाका आणि चमच्याने मिक्स करा. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. नंतर ब्रेड वाफवून घ्यावी. नंतर ब्रेडची एक स्लाइस घ्या त्यावर सारणाच गोल गोळा ठेवा आणि कॉर्न फ्लॉवरचे कडेने पाणी लावा त्यावर ब्रेडची दुसरी स्लाईस ठेवा आणि परत कॉर्न फ्लॉवर पाण्यात टाका आणि ब्रेड क्रममध्ये घोळा. नंतर गरम तेलात तपकिरी होईपर्यंत तळा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.