बारामती : पाऊस सुरु असताना भर पावसात चोरट्यांचा धुमाकुळ सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. दौंड तालुक्यातील केडगाव मधील वस्तीवर चोरीच्या उद्देशाने आलेल्या टोळक्याने हैदोस घातला आहे. यावेळी या चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करत दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाले आहेत. दरम्यान घटनेत शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.
च्या दौंड तालुक्यातील केडगाव मधील मोरे वस्तीवर शनिवारी रात्रीच्या सुमारास हि थरारक घटना घडली आहे. यात वस्तीमध्ये ५ ते ६ जणांच्या अज्ञात टोळक्याने चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला. मध्यरात्रीची वेळ असल्याने सर्वच कुटुंबीय गाढ झोपेत होते. काहीजण घराच्या अंगणात झोपले होते. तर काहीजण घरात झोपलेले होते. याच वेळी या चोरटयांनी परिसरात हैदोस घातला होता.
झोपलेले असतानाच केला वार
दरम्यान मोरे वस्ती परिसरात पोपट मोरे हे आपल्या राहत्या घरा समोर झोपलेले असताना अचानक आलेल्या या चोरट्यांनी पोपट मोरे यांच्यावर कोयत्याने वार केला. आवाज ऐकून जागे झालेले पोपट मोरे यांचे बंधू बाळासाहेब मोरे यांना देखील चोरट्यांनी गळ्याला चाकू लावत धमकावले. त्यांनी आरडाओरडा केल्याने चोरटे पसार झाले. यातील जखमी पोपट मोरे यांच्या वर केडगाव मधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दागिन्यांची केली चोरी
तर याच परिसरातील देशमुख भागात अशोक देशमुख यांच्या घरी देखील चोरट्यांनी दोन तोळे सोन्याच्या दागिन्यांची केली आहे. तर काकडे वस्तीवरील नवनाथ देशमुख यांच्या घराला बाहेरून कडी लावण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी भेट देत तपासाला सुरवात केली आहे.