हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कहाकर गावातील दोन शेतकरी कुटुंबाने शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी अवकाळी पावसात हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालया पुढे अपंग पत्नीला सोबत घेत आमरण उपोषण सुरू केल आहे, दत्ता गिरी असे या शेतकऱ्याचे नाव आहे ,कहाकर
गावातील काही शेतकऱ्यांनी या अल्पभूधारक शेतकऱ्याचा रस्ता अडवल्याने मागील अनेक महिन्यांपासून या शेतकरी कुटुंबाचे शेतात जाणे बंद झाले आहे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने त्यांनीच आपल्या प्रकरणात लक्ष घालून शेतात जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे या शेतकरी कुटुंबाने केली आहे.
सिंधुदुर्गात पावसाने घेतली उसंत, ढगाळ वातावरणगेले काही दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने आज पहाटेपासून बऱ्यापैकी उसंत घेतली आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये आजही वाढ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात 36 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात 102 मिलिमीटर झाला आहे. तर सर्वात कमी दोडामार्ग तालुक्यात 11 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान आज हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला असून संपुर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर पावसाचा जोर मात्र बऱ्यापैकी ओसरलेला आहे.
Maharashtra News Live Updates: सोलापूरच्या विमानसेवेचा मुहूर्त ठरला ; अखेर 9 जूनला सोलापुरातून गोव्यासाठी उडणार विमानसोलापूरकरआतुरतेने ज्या दिवसाची प्रतीक्षा करीत होते, अखेर तो दिवस जवळ आल्याची माहिती सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी जाहीर केली. येत्या ९ जूनपासून सोलापूर ते गोवा कमर्शियल विमानसेवा सुरू होणार आहे. मात्र,ही सेवा उडान योजनेंतर्गत नसणार आहे.त्यामुळे जादा पैसे मोजून सोलापूरकरांना विमानातून प्रवास करावा लागणार आहे.
सोलापूरकरांना उडान योनजेचे आश्वासन दिले गेले होते.आता या योजनेचे काय झाले,अशी विचारणा सोलापूरकरांकडून होत आहे.सोलापूर ते गोवा कमर्शियल विमान प्रवासाचे तिकीट दर कमीत कमी ३,४९१ रुपये, तसेच जास्तीत जास्त ५ हजार ६०० रुपये (यात ५ टक्के जीएसटीचा समावेश आहे) इतके असणार आहे.तेच उडान योजनेतंर्गत तिकिटाचे दर दोन ते अडीच हजार रुपये असणार होते.मंगळवार दुपारपासून ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू झाले असून,तिकीट बुकिंग करण्यासाठी अनेकांनी वेबसाइटला भेट दिली.त्यामुळे सायंकाळी फ्लाय ९१ ची वेबसाइट हॅक झाली.
भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्याचं स्वप्न भंगलंभंडाऱ्यात मागील चार दिवसात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आणि यातं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं भातपीक सापडलं. अनेक शेतकऱ्यांनी कापणी केलेला भातपीक मळणीसाठी शेतात ठेवला होता, तो पाण्याखाली आला. तर भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात भात पीक कापणीला आलेला असताना सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसात भातपीक अक्षरश: शेतात भुईसपाट झाला. तर, अनेक शेतकऱ्यांचं मळणी केलेलं भातपीक अचानक आलेल्या बेमोसमी पावसात ओलचिंब झालं. काहींचं भातपीक पाण्याखाली सडायला आलं आहे.कर्ज आणि सोनं गहाण ठेवून शेती पिकविण्याचा खटाटोप करणाऱ्या शेतकऱ्यांवर या मान्सूनपूर्व पावसानं मोठं आर्थिक संकट उभ केलं आहे.
भंडाऱ्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यूभंडारा जिल्ह्यात काल दुपारनंतर सर्वत्र पावसानं जोरदार हजेरी लावली. मेघगर्जनेसह आलेल्या पावसात शेतात हार्वेस्टर मशीनच्या माध्यमातून भातपीक कापणी सुरू असताना वीज कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला. तर, अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील खांबडी शेतशिवारात घडली. मृतकात एका महिलेसह हार्वेस्टर चालकाचा समावेश आहे. तर, दोन्ही जखमी है शेतमजूर आणि हार्वेस्टर वरील कामगार बसून दोघांवर सध्या अड्याळ येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. कांता जीभकाटे (५५) आणि विजय सिंग (४०) असं मृतकांचं नावं आहे. तर, संजय गाडेकर (४७) आणि महेश तेजासिंग (३०) असं गंभीर जखमी असलेल्यांची नावं आहेत.
वैद्यकीय निष्काळजीपणातही न्यायाला विलंब, ससूनमध्ये प्रकरणे प्रलंबितडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू किंवा अपंगत्व, चुकीचे उपचार, उपचारांत हलगर्जीपणा याबाबतच्या आलेल्या तक्रारींवर ससूनमधील वैद्यकीय तज्ज्ञांची समिती (मेडिकल बोर्ड) बैठक घेउन हलगर्जीपणा झाला किंवा नाही त्याचा अहवाल पोलिसांना देते. त्यानुसार संबंधित रुग्णालय, डॉक्टरांवर कारवाईची शिफारस करण्यात येते. मात्र, ससून रुग्णालयात विविध कारणांमुळे २०१९ पासून २२८ असे प्रकरणे प्रलंबित असून ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
११२ प्रकरणांमध्ये न्याय होणे बाकी आहे. ही प्रकरणे पुणे शहर, जिल्हा, पिंपरी चिंचवड व सहा प्रकरणे इतर जिल्ह्यांतील आहेत. सातारा, सांगली, अहिल्यानगर अशा काही जिल्ह्यांतील प्रकरणेही ससूनमध्ये वर्ग करण्यात आली आहेत.
नालासोपाऱ्यात २४० ग्राम वजनाचे मॅफोड्रीन ड्रग्स जप्तनालासोपाराच्या प्रगती नगरातून २४० ग्राम वजनाचा एम, डि, मॅफोड्रीन नावाचा ड्रग नायझेरिअन नागरिकांकडून जप्त करण्यात आला आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. बेन जोसेफ औनुमेरे एज़ीवगो (46) जॉन ओकाफोर (31) फेवर फ़िबी यूसुफ (36) असे या आरोपींची नावे आहेत
त्यांच्याकडून तब्बल ४८ लाख २४ हजाराचा मॅफोड्रीन ड्रग तुळींज पोलिसांनी पकडला आहे. पोलिसांच्या कारवाईत त्यांच्याकडे भारत देशात वास्तव्य करण्याकरिता आवश्यक असलेलं पारपत्र व व्हिसा आढळून आले नाही.
ते नालासोपाराच्या अंशित प्लाझा घर क्रमांक 203 या इमारतीमध्ये राहत होते. त्यांना राहण्यासाठी देण्यात आलेल्या घर मालकावर तसेच घर दाखवणाऱ्या एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षकांच्या सुट्टीला ब्रेक ,दोन जूनपासून प्रशिक्षण सुरूपुणे जिल्ह्यातून दोन हजारांहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण
वरिष्ठ वेतन श्रेणी अन् निवड वेतनश्रेणीसाठी राज्यभर एकाच वेळी असणार प्रशिक्षण
शिक्षकांची उन्हाळी सुट्टी झाली यंदा कमी
राlज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) मार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची ओळख, मूल्यांकन, स्कॉफ अशा विविध वीस विषयांची ओळख करुन देण्यासाठी वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणीसाठीचे प्रशिक्षण २ जूनपासून सुरू होणार आहे.
त्यासाठी पुणे जिल्ह्यातून वरिष्ठ वेतनश्रेणीस १४३३ आणि निवड वेतनश्रेणीसाठी १०६१ शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे
प्रत्येक वर्गात ४० ते ६० शिक्षकांचा समावेश असणार
पुण्यात टँकरची संख्या १५ टक्क्यांनी घटलीपुणे शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे टँकरच्या संख्येत घट
पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिलासा
शहरात मार्च तसेच एप्रिल या दोन महिन्यांत उन्हाचा चटका वाढला होता
त्यामुळे पाण्याच्या मागणीतही वाढ झाली होती. अपुरा पाणीपुरवठा आणि वाढलेल्या उन्हामुळे टँकरची संख्याही वाढत चालली होती
महापालिकेकडून आवश्यक पाणी मिळत नसल्याच्या तक्रारीदेखील वाढल्या होत्या
मात्र, गेल्या आठवड्यापासून शहरात सुरू झालेल्या पावसामुळे पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसह टँकरची मागणीही कमी झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाची माहिती
मार्च-एप्रिल या दोन महिन्यांत पाण्याची मागणी २५ टक्के वाढली होती, आता ही मागणी १५ टक्के कमी झाल्याची माहिती
बालाघाटच्या पर्वतरांगेतील येडशी येथील रामलिंग धबधबा प्रवाहितधाराशिव- गेल्या काही दिवसात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे मराठवाड्याचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील रामलिंग धबधबा इतिहास पहील्यांदाच मे महीन्यातच प्रवाहित झालाय.त्यामुळे पर्यटकांनी धबधबा पाहण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली आहे.बालाघाटच्या पर्वत रांगेत रांगेतील रामलिंग हा धबधबा ऐतिहासिक मानला जातो.रामायणात रावण आणि जटायू या दोघांचं या ठिकाणी युद्ध झालं होतं,या युद्धात रावनाने जटायू चा वध केला होता.चटायूला पाणी पाजण्यासाठी प्रभू श्रीरामाने या ठिकाणी बाण मारून पाण्याचा स्तोत्र निर्माण केला होता तेव्हापासून हा धबधबा प्रवाहित अशी आख्यायिका रामायणात सांगितली जाते.या ठिकाणी श्रीरामाने शिवलिंगाची स्थापना केली असून जटायूची समाधी देखील आहे.हे ठिकाण रामलिंग या नावाने प्रसिद्ध आहे.त्यामुळे इथे महाराष्ट्र सह परिराज्यातील भाविक व पर्यटक पावसाळ्यात गर्दी करतात.रामलिंग चा धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटकांची गर्दी हळूहळू वाढू लागली आहे.
जालना जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा धुमाकूळ, नद्या नाल्यांना पूर, पुढील तीन दिवस जालना जिल्ह्याला येलो अलर्टजालना जिल्ह्यात सर्व दूर पावसाने धुमाकूळ घातलाय जिल्ह्यातील नद्या नाल्यांना पूर आला असून बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव आणि वाकुनी गावामध्ये ओढ्याचे पाणी शिरले, त्यामुळे नेहमी जून महिन्यात प्रवाहित होणाऱ्या नद्या यावर्षी मे महिन्यातच प्रवाहित झाल्या आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील सुकना नदीला पूर आला असून घनसांवगी तालुक्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. तर जाफराबाद तालुक्यातील देखील नद्या दुथडी भरून वाहत आहे. काल जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांची दोन जनावरे अंगावर विज पडून दगावली आहे. दरम्यान जालना जिल्ह्याला पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे..
उल्हासनगर मधील रोडवर कचऱ्याचे साम्राज्यउल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील पूनम हॉटेल समोरील रोडवर रोज असाच कचरा पडलेला दिसून येत असून.नेहमीच असा हा कचऱ्याचा ढीग असतो. कचऱ्यामुळे तिथे घाणीचे साम्राज्य झाले आहे व सर्वीकडे दुर्गंधी पसरली आहे.येथून चालणे सुद्धा मुश्किल होत आहे, स्थानिक नागरिकांना या घाणीतून नाक दावून ये जा करावी लागत आहे,अशामुळे साथींच्या रोगांची शक्यता नाकारता येत नाही.उल्हासनगर महानगरपालिकेने शून्य कचरा या संकल्पनेनुसार करोडो रुपयांचा ठेका कोणार्क कंपनी ला दिला आहे. पण ह्या ठेक्याचा फायदा नक्की कुणाला होत आहे. उल्हासनगर शहरातील जनतेला, प्रशासनाला की कंपनीला असा प्रश्न उपस्थित होत आहे,
दिलीप दिसले यांच्या परिवाराला पाच लाखाची आसाम सरकारकडून मदतआसाम सरकारने सुद्धा पहलगाम हल्ल्यातील पनवेल येथील दिलीप दिसले दहशतवादी हल्ल्यांमध्ये ठार झाले होते त्यामुळे असं सरकारने आसाम सरकारचे पर्यावरण हवामान कायदामंत्री चंद्रमोहन पटावरी यांनी पनवेल इथे दिसले कुटुंबांची भेट घेत त्यांना आसाम सरकारकडून पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे
तसेच राज्य सरकारने सुद्धा 50 लाख रुपयांची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार दिसले कुटुंबांना सुद्धा राज्य सरकारने धनादेश अदा करण्यात आला आहे मुख्यमंत्री सहायता निधीतून हे धनादेश मंजूर करण्यात आले आहेत
पुण्यातील पालखी मार्गावर स्वागत कक्ष, स्पीकर उभारू नका, पालखी सोहळा प्रमुखांची मागणीजून महिन्यात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी च्या वतीने प्रशासनाला पुणे शहरातील पालखी मार्गावर स्वागत कक्ष आणि स्पीकर ची उभारणी नको अशी मागणी करण्यात आली आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान पुणे शहरात जागोजागी सार्वजनिक मंडळे, संस्था संघटनांकडून स्वागत कक्ष रस्त्यावरच उभारलेले जातात. हे स्वागत कक्ष पालखी रथ तसेच दिंडी प्रमुखांचे सत्कार करण्यात अग्रेसर असतात. अशावेळी प्रत्येक ठिकाणी रथ थांबला तरी, किमान दहा मिनिटे जात असल्याने पालखीला मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यास मोठा उशीर होतो. त्यामुळे हे स्वागत कक्ष रस्त्यावर असू नये, अशी मागणी आता करण्यात आली.
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावाचे तात्काळ पंचनामे करा , जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश
महसूल ,कृषी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष सूचना
सर्व विभागाकडून आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना
जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्जन्यमानाबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि घडलेल्या घटनांबाबत तत्काळ प्रतिसाद देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत
यासाठी जिल्हास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास सुरू असून, त्याचा हेल्पलाईन क्रमांक ०२०- २६१२३३७१, २६१३३५२२ आणि मोफत दूरध्वनी क्रमांक १०७७ आहे