जगभरातील लोकं मोठ्या आवडीने चहा पितात. विशेषतः आपल्या भारतात चहाप्रेमींची कमतरता नाही. कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही वेळी चहा प्रेमी चहा पित असतात. त्यात प्रत्येकांची दिवसाची सुरुवात एक चहाने होत असते. तर दिवसाचा शेवटही चहाच्या कपानेच होते, मात्र जास्त चहा पिणे आरोग्यास देखील नुकसान पोहोचवू शकते. चहा प्यायल्याने मूड ताजेतवाने होत असला तरी, त्याचे तात्पुरते फायदे असले तरी, ते अनेक तोटे देखील घेऊन येते. विशेषतः जर तुम्ही ते चुकीच्या वेळी प्यायले तर ते निश्चितच तुमच्या आरोग्यास नुकसान करू शकते. म्हणून, आयुर्वेद तज्ञांनी चहा पिण्याची योग्य आणि चुकीची वेळ सांगितली. चला तर मग आजच्या या लेखात आपण चहा पिण्याची योग्य आणि अयोग्य वेळ जाणून घेऊया…
– चहा कधीही रिकाम्या पोटी पिऊ नये, कारण यामुळे तुमच्या शरीरातील कॉर्टिसॉल वाढू शकतो, जळजळ वाढू शकते आणि कालांतराने अल्सर देखील होऊ शकतात.
– रात्री झोपण्यापूर्वी 8-10 तास आधी चहा अजिबात पिऊ नये. कारण यामुळे तुमची झोप बिघडू शकते आणि चिंता, निद्रानाशाच्या समस्या वाढू शकतात.
– जर तुम्हाला अॅसिडिटीची समस्या असेल तर या काळात चहा पिणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. खरं तर चहाचे स्वरूप आम्लयुक्त असते आणि म्हणूनच ते प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते.
– जेवणापूर्वी किंवा नंतर चहा पिणे देखील टाळावे. कारण चहामुळे पोषक तत्वे शोषण्याची क्षमता कमी होऊ शकते.
– चहामधील टॅनिन लोह शोषणात व्यत्यय आणू शकतात. हे टॅनिन लोहाशी बांधले जातात, ज्यामुळे शरीराला ते शोषणे कठीण होते. म्हणून, लोह पूरक आहार घेतल्यावर चहा पिणे टाळावे.
आता तुम्ही विचार करत असाल की, जर चहा पिण्याच्या सर्व वेळा चुकीच्या असतील, तर त्यासाठी योग्य वेळ कोणती? डॉक्टरांनी चहा पिण्याची योग्य वेळ देखील सांगितली आहे, ज्याचे पालन करून तुम्ही चहाचा आनंद घेऊ शकाल आणि त्यामुळे तुमचे नुकसान होणार नाही. चहा पिण्याची योग्य वेळ कोणती आहे ते आपण जाणून घेऊयात.
तुम्ही सकाळी उठल्यानंतर 1-2 तासांनी चहा पिऊ शकता. शक्यतो दुपारी 12 वाजण्याआधी चहा प्यावा. अशातच नाश्त्यात नट्स आणि सीड्स खाल्ल्यानंतरच चहा प्या.
ज्या लोकांचे कामाची वेळ ही रात्रीच्या शिफ्टमध्ये असते अशा लोकांनी रात्रीच्या वेळेस वेळेत अंतर ठेऊन चहा पिऊ शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)