कोचरे पतपेढी निवडणुकीत उत्कर्ष सहकार पॅनेल विजयी
esakal May 28, 2025 09:45 PM

swt288.jpg
66737
कोचरेः विजयी खूण दाखविताना उत्कर्ष सहकार पॅनेलचे उमेदवार.

कोचरे पतपेढी निवडणुकीत
उत्कर्ष सहकार पॅनेल विजयी
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. २८ः कोचरे उत्कर्ष (डॉ. शिरोडकर) सहकारी पतसंस्था मर्या. कोचरे या पतपेढीच्या निवडणुकीत उत्कर्ष सहकार पॅनेलचा विजय झाला. यामध्ये कोचरा गावचे माजी सरपंच सुनील करलकर, विद्यमान उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, शिवसेना विभाग प्रमुख दत्ता साळगावकर, माजी सरपंच यशवंत गोसावी, अर्जुन प्रभू, दत्ताराम राणे, अनंत म्हापणकर, प्रदीप राऊळ, कीर्ती गावडे, रंजना हंजनकर, नारायण नरे, उपेंद्र रावले हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले.
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विद्यमान सुभाष चौधरी यांनी प्रयत्न केले. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ब्रिजेश तायशेटे आणि त्यांच्या अन्य चार सहकाऱ्यांचा दारुण पराभव झाला. गेली २५ वर्षे ज्या गटाकडे जवळ पतसंस्था होती, त्या गटाकडे पुन्हा सत्ता आली आहे. पराभूत उमेदवारांत ठाकरे गटाच्या प्रतीक्षा पाटकर यांचा समावेश आहे. मुंबईचे माजी नगरसेवक अरुण नरे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. कोचरे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष उदय फणसेकर, निवती सरपंच अवधूत रेगे उपस्थित होते. निवडणूक अधिकारी प्रशांत साळगांवकर यांनी काम पाहिले. उदय फणसेकर यांनी मतदारांचे आणि निवडणूक कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.