Corona Virus: कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचा आणखी एक बळी, ५७ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
Saam TV May 28, 2025 11:45 PM
अभिजित देशमुख, कल्याण

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी आणखी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झालाय. कल्याण-डोंबिवलीमधील कोरोनाचा हा दुसरा बळी आहे. डोंबिवलीमधील ५७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या व्यक्तीवर कळवा रुग्णालयामध्ये गेल्या सहा दिवसांपासून उपचार सुरू होते.

आज सकाळी उपचारादरम्यान कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी ४७ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. कल्याण-डोंबिवलीमध्ये सध्या दोन कोरोना रुग्णांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनाने कल्याण-डोंबिवलीमधील नागरिकांची चिंता वाढवली आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाने टेन्शन वाढले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कल्याण- डोंबिवलीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ५ रुग्ण सापडले होते. यामधील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर उर्वरीत ३ पैकी दोन रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एक रूग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिकेकडून उपाययोजना केली जात आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, हात सतत धुवावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून केले जात आहे.

-डोंबिवलीमध्ये कोरोनाने टेन्शन वाढले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कल्याण- डोंबिवलीमध्ये कोरोनाचे ५ रुग्ण सापडले होते. यामधील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर उर्वरीत ३ पैकी दोन रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एक रूग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिकेकडून उपाययोजना केली जात आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, हात सतत धुवावेत असे आवाहन पालिकेकडून केले जात आहे.

देशामध्ये पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १००० पार गेला आहे. देशात सध्या १००९ सक्रीय कोरोना रुग्ण आढळले असून यामधील ७५२ नवे रुग्ण आताच समोर आले आहेत. देशभरात १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. कोरोनाचे सर्वाधिक ४३० रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात २०९, दिल्लीत १०४, कर्नाटकमध्ये ४७ रुग्ण आढळले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.