काय ‘मस्क’री चाललीय!स्पेसएक्सच्या स्टारशिपचे रॉकेट नवव्यांदा कोसळले
Marathi May 29, 2025 07:24 AM

अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या स्टारशिप प्रोग्रामला बुधवारी जोरदार झटका बसला. स्टारशिपची नववी चाचणीसुद्धा आज फेल झाली. स्टारशिप रॉकेटने बुधवारी सकाळी पाच वाजता आपली नववी मानवरहित रॉकेट वाहन चाचणी टेक्सासच्या बोका चिका येथून लाँच केली होती. परंतु अवघ्या 30 मिनिटांत या रॉकेटने आपले नियंत्रण गमावले. यानंतर हे रॉकेट हिंद महासागराच्या पृथ्वीवरील वायुमंडळात पोहोचले. तेव्हा ते दुर्घटनाग्रस्त झाले. या स्टारशिपद्वारे एलॉन मस्क चंद्र आणि मंगळ ग्रहावर लोकांना घेऊन जाणार होते. तसेच या ठिकाणी एक छोटेसे शहर वसवणार होते. परंतु त्यांच्या या स्वप्नाला जोरदार धक्का बसला आहे. या प्रोग्रामचे नाव ‘रोड टू मेकिंग लाइफ मल्टीप्लॅनेरी’ असे ठेवण्यात आले होते. लाँचिंग आधी मस्क यांनी म्हटले होते की, स्टारशिप मंगळ ग्रहावरचा प्रवास 6 महिने करू शकते. आज लाँच करण्यात आलेल्या मिशनला स्टारशिप फ्लाईट 9 असे नाव दिले होते. यात शिप 35 चा वापर करण्यात आला होता. याआधीही करण्यात आलेल्या चाचण्या तांत्रिक बिघाडामुळे अयशस्वी झाल्या आहेत. या रॉकेटला हिंद महासागरात उतरवण्याची तयारी केली जात होती. परंतु पृथ्वीकडे येताना हे रॉकेट क्रॅश झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.