How to make oats beetroot dosa for breakfast: तुम्हाला सकाळी नाश्त्यात काही पौष्टिक खायचे असेल तर ओट्स बीट डोसा तयार करू शकता. हा डोसा कमी वेळेत तयार होतो. तसेच चवीला देखील उत्तम आहे. घरी एकदा नक्की ट्राय करा. ओट्स बीट डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.
ओट्स बीट डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्यओट्स
बीट
मसुर डाळ
मुग डाळ
आलं
हिरवी मिरची
तेल
मीठ
ओवा
जिरं
ओट्स बीट डोसा बनवण्याची कृतीओट्स बीट डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यात ओट्स, बीटचे तुकडे, मसुर डाळ, मुग डाळ,हिरवी मिरची, लसूण पाकळ्या,मीछ, जिरं, आलं सर्व टाकून चांगले बारिक करा. नंतर एका भांड्यात हे सारण काढा. नंतर डोसा तवा गरम करा. नंतर थोडे तेल लावा आणि डोसा तयार करून घ्या. चांगला भाजून झाला की प्लेटमध्ये काढा दही किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.