रोटरी क्लबचे शिक्षण क्षेत्रात योगदान
esakal May 29, 2025 11:45 PM

swt294.jpg
66960
पणदूरः अशोक परब यांच्या वतीने पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाला स्मार्ट बोर्ड प्रदान करताना डॉ. संजय केसरे व इतर मान्यवर.

रोटरी क्लबचे शिक्षण क्षेत्रात योगदान
डॉ. संजय केसरे ः पणदूर महाविद्यालयास स्मार्ट बोर्ड प्रदान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २९ ः रोटरी क्लबच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांसाठी काहीतरी योगदान देता येते, याचा आनंद वाटतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय हे एक नामांकित महाविद्यालय आहे. अभिजित परब आणि कुटुंबीयांनी दिलेल्या स्मार्ट बोर्डमुळे अध्यापन अधिक गतिमान होईल, असे प्रतिपादन रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष डॉ. संजय केसरे यांनी केले.
येथील प्रसिद्ध उद्योजक, मराठा क्लॉथ स्टोअर्सचे मालक अशोक उर्फ बाबीशेठ परब यांनी रोटरी क्लब कुडाळच्या ३२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाला स्मार्ट बोर्ड प्रदान केला. (कै.) शशिकांत अणावकर यांच्याशी असलेल्या स्नेहसंबंधांमुळे महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच परब मदत करत आहेत. रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष डॉ. केसरे यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २७) हा स्मार्ट बोर्ड महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला. यावेळी अशोक परब यांचे सुपुत्र अभिजित परब, रोटरी क्लबचे सचिव राजू पवार, रवींद्र परब, गजानन कांदळकर, प्रमोद भोगटे, प्रणय तेली, प्र. प्राचार्य डॉ. राजेंद्र पवार उपस्थित होते.
पणदूर महाविद्यालयाने अशा स्मार्ट बोर्डचा वापर करून हायटेक टेक्नॉलॉजी शिक्षण सुरू केले तर महाविद्यालयासाठी ते फायद्याचे ठरेल, असे सांगत महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी लवकरच ‘एआय’चे ट्रेनिंग देण्यात येईल, असे कुडाळ रोटरीचे सदस्य प्रणय तेली यांनी आश्वासित केले.
प्रा. पवार यांनी या दातृत्वाबद्दल परब कुटुंबीय व रोटरी क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. आभार प्रदर्शन प्रा. डी. व्ही. गावडे यांनी केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.