वेळोवेळी मंत्री गोविंद गावडेंचा सरकारला मोठा आधार झालेला आहे. शिरोडा मतदारसंघातील पोटनिवडणूत असू वा 2022ची निवडणूक असू. डॉ.प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री करण्यात देखील गोविंद गावडेंचा सिंहाचा वाटा. उटाचे अध्यक्ष विश्वास गावडेंचा उटाच्या सभेत दावा.
मंत्री गावडेंच्या विरोधात सरकारातून षडयंत्र, 'उटा'गावडेंच्या पाठीशी खंबीरमंत्री गोविंद गावडेंच्या विरोधात सरकारातूनच षडयंत्र सुरु आहे. एक कोण तरी राजकीय व्यक्ती गावडेंचे अस्तित्व संपवू पाहत आहे. मात्र आम्ही ठामपणे सांगू इच्छितो की मंत्री गोविंद गावडेंच्या पाठीशी उटा संघटना ठामपणे उभी आहे - विश्वास गावडे, अध्यक्ष, उटा संघटना
बांदोडा पंचायतीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट पंचायतीचा पुरस्कारमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बांदोडा पंचायत मंडळाला उत्कृष्ट पंचायतीचा पुरस्कार दिला. वीजमंत्री सुदिन ढवळीकर आणि माधवराव ढवळीकर यांच्या योगदानामुळे पंचायतीला पुरस्कार मिळाला असे सरपंच रामचंद्र नाईक म्हणाले.
आडपईत दोन तासांत झाड कोसळण्याची दुसरी घटना, सुदैवाने दुर्घटना टळली!आडपई येथे महेश नाईक आणि गुरुदास नाईक यांच्या घरावर झाड कोसळले. अवघ्या एका तासात दोन घरावर झाडे कोसळले. सुदैवाने दुर्घटना टळली.
आडपई येथे घरावर कोसळला माड, सुदैवाने दुर्घटना टळली!आडपई येथील मंगलदास नाईक आणि श्रीकांत नाईक यांच्या घरावर माड कोसळल्यानंतर माडाचा काही भाग रस्त्यावर कोसळला. घटनेवेळी रस्त्यावर कोणीच नसल्याने दुर्घटना टळली. फोंडा अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल.
पर्यावरण, कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा दिल्ली रुग्णालयात दाखलगोव्याचे पर्यावरण आणि कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना उपचारासाठी पुन्ही दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
साखळीत घरफोडी! 2.25 लाखांच्या चोरीप्रकरणी तिघांना अटकसाखळीत घरफोडी केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी भीमा (३६), बाबजान (५०) आणि जावेद (४०) यांना अटक करण्यात आली आहे. तिघांनी घरफोडी करुन ७५ हजार रोख, ७० हजार रुपयांची सोन्याची चैन आणि ७० हजार रुपयांची सोन्याची नाणी चोरी केली आहे.
गोव्यातून अपहरण झालेली 15 वर्षीय मुलगी बिहारमध्ये सापडलीडिचोली, गोवा येथील अपहरण झालेली 15 वर्षीय मुलगी बिहारमध्ये सापडली आहे. २८ फेब्रुवारी ते ०१ मार्च या काळात मुलीचे अपहरण झाले होते पोलसांनी तपासअंती मुज्जफपूर येथून मुलीचे सुटका केली आहे. मुलगी सुरक्षित असून, २३ वर्षीय संशयित संदेशला अटक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद यांच्याकडून गोमंतकीयांना घटक राज्य दिनाच्या शुभेच्छामुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना गोवा घटक राज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
समेस्त गोंयकारांक गोंय घटक राज्य दिसाचीं परबीं!