Nashik News : गोदावरी स्वच्छता मोहिमेला मिळणार नवा वेग! डॉ. गोऱ्हे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
esakal May 31, 2025 08:45 PM

नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने गोदावरी नदी स्वच्छता अभियानास गती देण्यात यावी. कुंभमेळ्यात येणाऱ्या महिला व बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष यंत्रणा उभारावी, अशी विनंती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

डॉ. गोऱ्हे यांनी २३ मेस नाशिकमध्ये आढावा बैठक घेतली. बैठकीत महिला व बालकांच्या सुरक्षिततेवर भर देण्यात आला. या आढावा बैठकीनंतर डॉ. गोऱ्हे यांनी बुधवारी (ता. २८) विशेष बस असाव्यात सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांसाठी सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह विशेष बसची व्यवस्था करावी. पायी मार्गाच्या नियोजनासह महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृह असावे.

चांदवड, शिर्डी, शनिशिंगणापूर, सप्तश्रृंगगडासारख्या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांशी दळणवळण व्यवस्था सुधारावी आदी शिफारशी पत्रात केल्या आहेत. आरोग्य सेवांसाठी खासगी व धर्मादाय रुग्णालयांचा सहभाग सुनिश्चित करताना तात्पुरती आरोग्य केंद्रे उभारावी. तपासणी शिबिरे व रुग्णवाहिकांची सेवा कार्यान्वित करावी. नाशिकमध्ये प्रमुख मंदिरांची डागडुजी करावी. लोकप्रतिनिधींना सिंहस्थ आराखडा उपलब्ध करून द्यावा आदी मागण्या गोन्हे यांनी केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात विविध शिफारशी करण्यात आल्या आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक, बालक व दिव्यांग भाविकांसाठी स्वतंत्र व सुरक्षित वस्त्रांतरगृह उभारावे. गोदावरी स्वच्छता अभियानास अधिक गती देतानाच शौचालये, मेला व्यवस्थापन, घनकचरा प्रक्रिया आणि पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यावरही भर द्यावा. या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितता साधने व आवश्यक लसीकरण करावे, अशी मागणीही गोऱ्हे यांनी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.