Maharashtra Live Updates : शासकीय कर्मचारी महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ, तब्बल तीन कोटी रुपये लाटले
Sarkarnama May 31, 2025 08:45 PM
शासकीय कर्मचारी महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ

माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ शासकीय सेवेत असलेल्या तब्बल 2652 महिलांनी घेतल्याचे समोर आले आहे. या महिला कर्मचाऱ्यांनी तब्बल 3 कोटी 58 लाख रुपयांचा लाभ घेतला. हे पैसे सरकारकडून वसुल करण्यात येणार आहे. दरम्यान, फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून योजना आणल्या की काय होतं हेच यातून सिद्ध होतं. पण आतातरी सरकारने संबंधित योजनेतील गैरप्रकारांना आळा घालावा आणि निवडणुकीत ₹१५००चे ₹२१०० करण्याचं दिलेलं आपलं आश्वासन पूर्ण करावं, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.