BJP MLA Driver Death | Pankaj Deshmukh यांच्या मृत्यूप्रकरणी पत्नीचा मोठा आरोप, सीआयडी चौकशीची मागणी
भाजप आमदार संजय कुटेंच्या वाहनचालकाच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण आलंय…भाजपा कार्यकर्ता पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीनं केलाय…पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सी. आय. डी. चौकशीची मागणी पत्नी सुनीता देशमुखांनी केलीये…बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील ३ मे रोजी एका शेतात पंकज देशमुखांचा मृतदेह आढळला होता…त्यांच्या अंगावर काही ठिकाणी जखमा आढळल्या होत्या… पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे घातपात झाल्याची तक्रार दाखल केली…तसंच पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्नचिनह उपस्थित केलाय…पंकज देशमुख हे गेल्या २२ वर्षांपासून आमदार कुटेंचे वाहनचालक आहे…अशातच त्यांच्या पत्नीने उपस्थित केलेल्या शंकांमुळे अनेक चर्चांना उधाण आलंय.