Millet Dosa Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा पौष्टिक मिलेट्स डोसा, रविवार होईल खास
esakal June 01, 2025 02:45 PM

how to make millet dosa at home: रविवारी सकाळी नाश्त्यात पौष्टिक पदार्थ खायचे असेल तर मिलेट्स डोसा बनवू शकता. मिलेट्स हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मिलेट्स डोसा बनवणे खुप सोपा असून चवदार देखील आहे. तुमच्या घरातील सर्व सदस्य हा डोसा आवडीने खातील. मिलेट्स डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

मिलेट्स डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बाजरी - २ कप
ब्राउन राइस - १ कप
उडदाची डाळ - १/२ कप
चणाडाळ - १/४

वाटी मेथी - १ टीस्पून
मीठ - १ टीस्पून
पाणी - १/२

मिलेट्स डोसा बनवण्याची कृती

मिलेटेस डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात फॉक्सटेल बाजरी, तपकिरी तांदूळ, उडदाची डाळ, मेथीचे दाणे घाला. ते सर् तीन वेळा स्वच्छ धुवावे. नंतर ६ ते ७ सात भिजत ठेवावे. नंतर मिक्सरमध्ये पीठ बारिक ररून घ्यावे. नंतर रात्रभर आंबवण्यासाठी ठेवावे. नंतर मीठ आणि पाणी घालून चांगले मिसळा. नंतर गरम तव्यावर मिश्रण टाका आणि डोसा तयार करून घ्यावे. गरमा गरम डोसा चटणीसोबत सर्व्ह करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.