Chandrapur News – धावत्या वाहनात चालकाला फिट, हायवाने 10 वाहनांना चिरडले; एका तरुणीचा मृत्यू
Marathi June 03, 2025 04:27 AM

धावत्या वाहनात चालकाला फिट आल्याने हायवाने 10 वाहनांना चिरडल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली. वाहनांना चिरडत फुटपाथवरील नागरिकांनाही धडक दिली. या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला असून एक तरुणी जखमी झाली आहे. तुकुम-ताडोबा रस्त्यावर हा अपघात घडला. स्थानिकांनी जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला फिट आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हायवाने फुटपाथवरील नागरिकांना धडक देत दहा वाहनांना चिरडले. अपघातात हायवाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अपघातात ठार झालेली सानिका कुमरे ही तरुणी पोलीस भरतीची तयारी करत होती. पोलिसांनी हायवा चालकाला ताब्यात घेतले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.