RCB win IPL 2025 Final Match: इंडियन प्रीमियर लीग 2025चा अंतिम सामना 3 जून रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. आयपीएलने केवळ बीसीसीआयच नाही तर जिओ हॉटस्टार सारख्या प्रसारकांचेही खिसे भरले आहेत. यावर्षी 64.3 कोटी प्रेक्षकांनी अंतिम सामना पाहिला आहे.
गेल्या वर्षी 60.2 कोटी क्रिकेटप्रेमींनी जिओ सिनेमावर आयपीएलचा अंतिम सामना पाहिला, म्हणजेच यावेळी गेल्या वर्षीचा विक्रमही मोडला आहे. आता जिओ सिनेमा आणि हॉटस्टारच्या विलीनीकरणानंतर, यावर्षी कोट्यवधी लोकांनी जिओ हॉटस्टारवर पीबीकेएस आणि आरसीबी यांच्यातील सामन्याचा आनंद घेतला.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील अंतिम सामन्याने मुकेश अंबानींचेही खिसे भरले आहेत. हॉटस्टार आणि जिओ सिनेमाच्या विलीनीकरणानंतर, मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा जिओ हॉटस्टारमध्ये 63.16 टक्के हिस्सा आहे, उर्वरित हिस्सा व्हायकॉम 18चा आहे.
मुकेश अंबानींनी पैसे कसे कमावले?सामना पाहण्यासाठी लोक जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन खरेदी करतात, ज्यातून जिओ हॉटस्टारची कमाई होते. सबस्क्रिप्शन प्लॅनमुळे कंपनीचा महसूल वाढतो, केवळ सबस्क्रिप्शन प्लॅनच नाही तर मुकेश अंबानी सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमधूनही खूप कमाई करतात.
मुकेश अंबानींनी 6,000 कोटी कमावले का?आयपीएल सामन्यादरम्यान 10 सेकंदांची जाहिरात दाखवण्यासाठी साधारणपणे 18 ते 19 लाख रुपये घेतले जातात. आयपीएल सुरू होण्यापूर्वी, याबाबत बरीच चर्चा झाली होती. मुकेश अंबानी आयपीएल सामन्यादरम्यान जाहिराती दाखवून 6,000 कोटी कमवू शकतात असा अंदाज बांधण्यात आला होता.