आजचे पंचांग आणि दिनविशेष - 2 जून 2025
esakal June 02, 2025 01:45 PM
पंचांग

२ जून २०२५ साठी

सोमवार : ज्येष्ठ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ५.४२, सूर्यास्त ७.०८, चंद्रोदय सकाळी ११.३८, चंद्रास्त उ. रात्री १२.४०, भारतीय सौर ज्येष्ठ १२ शके १९४७

दिनविशेष
  • २००१ : जम्मू-काश्मीरमधील हॅनले वेधशाळा आणि बंगळूर येथून ३५ किलोमीटर अंतरावरील होस्कोट संशोधन केंद्रातील उपग्रह संपर्क यंत्रणेचे उद्घाटन.

  • २००३ : ‘आकाश’ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

  • २००५ : लष्कराच्या महिला गिर्यारोहकांच्या पहिल्या तुकडीचा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा पराक्रम.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.