DCM Ajit Pawar on Maharashtra Farming in Pune Gree hackothon
Marathi June 02, 2025 03:25 PM


पुणे : शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे ही समज ठेवून आपण जर एकत्र काम केले, तर महाराष्ट्राची शेती ही डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. राज्य शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंचन नगर मैदान, कृषी महाविद्यालय येथे आयोजित पुणे ग्री हॅकॅथॉन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. (DCM Ajit Pawar on Maharashtra Farming in Pune Gree hackothon)

हेही वाचा : Mumbai Crime : शहरात फसवणुकीचे दोन प्रकार, पैशांचा अपहार अन् बोगस अ‍ॅपद्वारे एकाला अडीच कोटींची फटका 

शेती फक्त शेतकर्‍यांची जबाबदारी नसून उद्योग, शास्त्रज्ञ, शासन आणि समाज यांचे संयुक्त उत्तरदायित्व आहे. शासनामार्फत ग्री स्टॅक, डिजिटल क्रॉप सर्व्हे, स्मार्ट सिंचन, कृषी डेटा मिशन, एफ.पी.सी. सक्षमीकरण आणि सेंद्रिय शेती प्रोत्साहन यांसारखे अनेक उपक्रम राबवित आहोत. शेतीमधून शाश्वत उपजीविका निर्माण करणे हा शासनाचा प्रमुख उद्देश असून, आत्मनिर्भर महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्याच्या कृषी क्षेत्राच्या प्रगतीची गती वाढविण्यासाठी आपण किती समर्पण भावनेने काम करतो यावर महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे भविष्य अवलंबून आहे, असे अजित पवार म्हणाले. उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होणे म्हणजे स्वयंपूर्ण झालो असे नाही. उत्पादनाची गुणवत्ता राखली जाणे, व्यवस्थित त्याची जाहिरात होणे, बाजारपेठ मिळणे आणि त्याला बाजारभाव मिळणे ही मूल्यसाखळी आपल्याला निर्माण करायची आहे. हवामान बदलामुळे शेतीपुढे खूप आव्हाने आहेत. एका क्षणात शेतीचे प्रचंड नुकसान होते. अशा परिस्थितीत शासन म्हणून शेतकर्‍यांच्या मागे उभे राहणे, आपला विचार, अभ्यास, प्रत्यक्षात आणणे, त्यातून शेतकर्‍याला ज्ञान देणे ही खरी काळाची गरज आहे.

शेतकर्‍याला युनिक फॉर्मर आयडी

राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी ग्री स्टॅक नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेत प्रत्येक शेतकर्‍याला एक युनिक फॉर्मर आयडी दिला जात आहे. हा नंबर म्हणजे शेतकर्‍याची ओळख – जशी आपली आधारकार्डवर ओळख असते, तशीच ही शेतीसाठी खास ओळख असेल. या नंबरद्वारे शेतकर्‍याची जमीन, घेतलेली पिके, मिळालेली अनुदानं, विमा, कर्ज याची सर्व माहिती जोडली जाईल. त्यामुळे भविष्यात कुठलीही योजना मिळवण्यासाठी वारंवार कागदपत्रं देण्याची गरज भासणार नाही.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.