मनुका हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मनुका पोषकतत्त्वांचा खजिना आहे. यात लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, ऍटी-ऑक्सिडंट्स, फायबर आढळतात. आरोग्यतज्ञांच्या मते, महिलांसाठी तर मनुका सुपरफूड सांगण्यात आले आहे. मनुका जर पाण्यात भिजवून खाल्ला तर त्याचे दुप्पट फायदे होतात. पण, मनुके पिवळे की काळे खावेत? याविषयी अनेक महिलांमध्ये संभ्रम दिसून येतो. अशा वेळी तज्ज्ञांच्या मते, काळे मनुका खाणे आरोग्यासाठी अधिक फायद्याचे ठरते. महिलांच्या लैंगिक समस्येपासून ते गर्भधारणेपर्यंत अनेक समस्यांवर काळ्या मनुका रामबाण उपाय मानल्या जातात. आज आपण जाणून घेऊयात, महिलांनी काळ्या मनुका का खाव्यात? त्याचे फायदे काय आहेत?
प्रजनन क्षमता वाढवते –
महिलांनी त्यांच्या आहारात काळ्या मनुक्याचा समावेश अवश्य करावा. कारण प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी काळ्या मनुका वरदान समजल्या जातात. तुम्ही रात्रभर पाण्यात भिजवलेले काळ्या मनुका सकाळी खायला हव्यात.
गरोगरपणात फायदेशीर –
गरोदरपणात काळ्या मनुका आपल्या आहाराचा भाग बनवायला हव्यात. काळ्या मनुक्याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तुम्ही काळ्या मनुका पाण्यात भिजवून खाऊ शकता.
अशक्तपणा दूर करते –
आर्युर्वेदानुसार, मनुका हे लोहाचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी मनुक्याचे सेवन करू शकता. मासिक पाळीत जाणवणारी लोहाच्या कमतरतेची समस्या दूर करण्यासाठी मनुका खाणे फायद्याचे ठरेल.
हिमोग्लोबिन वाढवते –
दररोज 7 ते 8 मनुका खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते. ज्यामुळे थकवा जाणवत नाही.
रक्तदाब नियंत्रणात राहतो –
मनुक्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात. या खनिजांमुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत होते. याशिवाय रक्तदाबाची पातळी नियंत्रणात राहते.
लैंगिक आरोग्य सुधारते –
काळ्या मनुक्यामध्ये पुरेशा प्रमाणात एमिनो ऍसिड असते, जे लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते.
त्वचेसाठी फायदेशीर –
मनुक्यातील व्हिटॅमिन सी, ऍटी-ऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार ठेवतात, हे सुरकुत्या, डाग कमी करतात.
केसांसाठी वरदान –
मनुक्यातील व्हिटॅमिन बी कॉप्लेक्स आणि झिंक केसांना मजबूत बनवतात आणि केसगळती कमी करतात.
हेही पाहा –