आळेफाटा, ता.२ : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. ३) ते रविवार (ता. ८) या कालावधीत जनावरांचा बाजार बंद ठेवण्याच्या शासनाच्या आदेशान्वये आळेफाटा उपबाजारात गुरुवारचा (ता. ५) भरणारा संकरित गायांचा बाजार बंद राहणार आहे, अशी माहिती सभापती संजय काळे उपसभापती प्रीतम काळे, सचिव रूपेश कवडे, दीपक म्हस्करे यांनी दिली.
महाराष्ट्र प्राणी संरक्षण संपूर्ण राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू केली आहे. बकरी ईद सण येत्या शनिवार आहे. यामध्ये गोवांश कत्तल होऊ नये म्हणून जनावरांचा बाजार मंगळवारपासून सहा दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आळेफाटा येथे दर गुरुवारी संकरित गाईंचा आठवड्याचे बाजार भरतो हा बाजार गुरुवारी भरणार नसल्याचे शेतकरी व व्यापारी यांनी गायी विक्रीस आणू नयेत असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.