गेल्या मे महिन्यात मान्सून पूर्व झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष पिकांवर करपा, डाउनी आणि बुरशी या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे, यातच जमीन ओली असल्याने ट्रॅक्टर द्वारे फवारणी करणे अवघड झाल्याने आता शेतकरी ड्रोनच्या साह्याने द्राक्ष पिकांवर औषधाची फवारणी करत असल्याचे दृश्य निफाड तालुक्यात दिसत आहे
Nashik News: नाशिकच्या पेठ रोड भागात एका इसमाची हत्यामध्यरात्री अज्ञात लोकांनी केली हत्या संजय सासे या व्यक्तीची हत्या
- संजय सासे ही व्यक्ती बाबागिरी करत असल्याची स्थानिकांची माहिती
- पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अधिक तपास सुरू...
धाराशिव जिल्ह्यातील खवा व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीइंडक्शन खवा मशीन वरती खवा उत्पादन करण्यासाठी टेरीफ मध्ये वीज कनेक्शन देण्यास राज्य शासनाने मान्यता दिलीय.
त्यामुळे आता खवा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.
धाराशिव च्या भूम परिसरामध्ये दिवसाकाठी 40 ते 50 टन खव्याची निर्मिती केली जाते
या परिसरातील शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून खवा बणवण्याचा व्यवसाय करतात.
शासनाच्या या निर्णयामुळे खवा उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात वीज बिलामध्ये सूट मिळणार आहे.
Gujrat: गुजरातमधून महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या बनावट बियाणांवर कृषी विभागाची कारवाईकृषी विभागाची बनावट बियाणं संदर्भात मोठी कारवाई धुळ्यात उघडकीस आली आहे,
जवळपास 30 लाखांपर्यंत बनावट बियाणे व मुद्देमाल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत,
गुजरात कडून महाराष्ट्रामध्ये ही बनावट बियाणे आणण्यात येत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे,
पुसदमध्ये बोगस खतांचा ट्रक पकडला, कृषी विभागाची संयुक्त कारवाईयवतमाळच्या पुसद तालुक्यातील सावंगी गावाजवळ अनाधिकृत खताने भरलेला ट्रक पुसद कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभाग यांनी अधिकृतपणे ट्रक मधील खत व ट्रक ताब्यामध्ये घेतला या ठिकाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुद्धा उपस्थित असून अनाधिकृतपणे खताने भरलेला ट्रक पकडण्यात आला आहे. सध्या शेतामध्ये शेतकऱ्याच्या पेरणीचे दिवस जवळ आल्यामुळे बोगस बियाणे व अनाधिकृत खते परिसरामध्ये येत असल्याची कृषी विभागाला माहिती मिळाल्यावरुन संबंधित ट्रक मधील खताची तपासणी करण्यात येत असून पुढील तपास तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेत दिव्यांग कल्याण निधीचे वितरण, 283 लाभार्थ्यांना नव्वाद लाखांचा धनादेशाचे वाटपदिव्यांग बांधव हे समाजाचा अविभाज्य भाग असून, त्यांच्या सक्षमीकरणाला चालना देणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन दिव्यांगांसाठी संधी निर्माण केली तरच त्यांच्या विकासाचा खरा अर्थ साधता येईल, असे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी केले.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे दिव्यांग कल्याण निधी व सानुग्रह अनुदान वितरणाचा कार्यक्रम नगर परिषद तळेगाव दाभाडे कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला दिव्यांग महिलासह नागरिकांनी मोठा सहभाग घेतला होता..
वारजे टेकडी परिसरात एकाचा संशयास्पद मृत्यूसदरच्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती....
व्यक्ती कोण आहे, गळफास नेमका का घेतलाय याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत...
गळफास घेणाऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसल्याची पोलिसांची माहिती....
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा शोध व बचाव पथकाकडून मॉकड्रिलमान्सून कालावधीत उद्भवणान्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी अमरावती जिल्हा शोध व बचाव पथक तसेच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाद्वारे शहरातील छत्री तलाव येथे मॉकड्रिल करण्यात आले.
शहरासह ग्रामीण भागात अचानक पूरपरिस्थिती आल्यास पाण्यापासून बचावाकरिता कुठलेही साहित्य वापरता येईल याचे प्रात्यक्षिकदेशील यावेळी करून दाखविले.
यावेळी महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी बचाव पथकांकडून माहिती जाणून घेतली.
सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना सज्ज ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
पिसाळलेल्या कुत्र्याने तोडले लचके, चार वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यूअरविंद सचिन गायकवाड ४ वर्षे, नागेश्वर कॉलनी या बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला करीत, त्याच्या चेहरा, मान, गळ्याचे लचके तोडले. यात या बालकाचा मृत्यू झाला.
ही धक्कादायक घटना नागेश्वर कॉलनीत घडली. अन्य चार ते पाच जणांनाही कुत्र्याने चावा घेतला.
मजुरी काम करणारे सचिन गायकवाड यांचा मुलगा अरविंद हा अंगणात खेळत होता.
त्यावेळी कुत्र्याने हल्ला करत बालकाच्या खोलवर जखमा केल्या. लचके तोडल्याने बालक रक्तबंबाळ झाले.
काँग्रेसचे रस्त्यावर मासे पकडून अभिनव आंदोलनपुणे महानगरपालिका मध्ये भ्रस्टाचारी ठेकेदारानि ठेके भरले आहेत कीकाय असा प्रश्न पडला आहे.
आळंदी रोड येथील भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर Brt बस्टॉप चौकात ठेकेदारने वाहतूक विभागाची परवानगी न घेता, ड्रेनेज चे काम तर केले.
पण ते काम अक्षरशः आधी जसे नादुरुस्त होते तसेच त्यांनी केले आहे.
त्यात काहीच बदल केला नाही. खड्डा तसाचं राहिला आहे.
ड्रेनेज त्यात खाली गेले आहे.
या वेळी काँग्रेस चे वडगावशेरी उपाध्यक्ष सचिन भोसले यांनी त्या तुटलेले ड्रेनेज वर बसून प्रतिकात्मक भ्रष्टाचाराचे मासे पकडून वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
व ते ड्रेनेज पुन्हा दुरुस्त करा अशी मागणी केली अन्यथा आंदोलन करू.
FYJC Admission: अकरावीसाठी राज्यभरातील विद्यार्थी नोंदणी १० लाखांपारइयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत राज्यभरातील विद्यार्थी नोंदणीचा १० लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे
त्यात पुणे विभागातील १ लाख ६४ हजार विद्यार्थ्यांचा समावेश असून, पहिल्या नियमित फेरीसाठी विद्यार्थ्यांना ३ जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे
पुणे विभागातील १ लाख ६४ हजार ९८३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे
त्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील ९४ हजार २४३ विद्यार्थी असून, त्या खालोखाल अहिल्यानगर जिल्ह्यातील ३९ हजार ७५९ विद्यार्थ्यांनी भरला अर्ज
Solapur: सोलापुरात दुचाकीने धडक दिल्याने 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यूआजीसोबत चालत जात असताना दुचाकीने धडक दिल्याने सोलापुरात एका 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला.
शिवांशू ऊर्फ बंटू लक्ष्मीनारायण बोद्धूल असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.31 मे रोजी दुपारी सोलापुरातल्या गेंट्याल चौक ते शास्त्री नगर रस्त्यावर हा अपघात झाला.
जखमी अवस्थेत शिवांशू याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मात्र रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एका अद्यात महिला दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Farmers Death: अवकाळी पावसाने कांद्याचे नूकसान झाल्याने शेतकऱ्यांची आत्महत्याआष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील शेतकरी गोविंद रंगनाथ आंधळे वय 42 वर्ष यांनी अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाल्याने व डोक्यावर 10 लाख रुपये कर्ज असल्याने या शेतकऱ्यांनी आत्महत्या शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.सरकार अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याची वेळ पाहणार आहे असा सवाल जनतेतुन विचारला आहे.
अखेर सीबीएसईच्या काही शाळांना शासन निर्णय मान्यसीबीएसई संलग्न शाळांचा ५ जूनऐवजी ११ व १६ जूनला शाळा सुरू करण्याचा निर्णय
सीबीएसईशी संलग्न शाळांनी उन्हाळ्याच्या सुट्या संपवून शाळा सुरू करण्याचा दिवस त्यांच्या सोयीने ठरविला आहे
एकाच परिसरातील शाळा सुरू करण्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत
काही शाळांनी त्यांचा निर्णय बदलला असून, राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार १६ जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे
Pune International Airport: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता 235 विमानांची ये जा होणारयापूर्वी पुणे विमानतळावरून दिवसाला 220 विमानांची ये जा होत होती
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांना पत्र लिहिले होते
या नंतर आता हवाई दलाकडून आता आणखी पंधरा विमानांना उड्डाणासाठी मंजुरी देण्यात आली आहे
पुणेकरांच्या जलद आणि सुलभ प्रवासासाठी आम्ही निश्चितच कटिबद्ध आहोत अशी प्रतिक्रिया मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटरवरून दिली
बिजवाई सोयाबीनला ५९०० रुपयांचा उच्चांकी दरमागील वर्षभरापासून सोयाबीनचे दर निच्चांकी पातळीवर होते. मात्र आता खरीप हंगामासाठी सोयाबीनच्या बियाण्याची मागणी वाढल्यानं वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत बिजवाई सोयाबीनला ४४२० ते ५९०० रुपयांचे उच्चांकी दर मिळालेत. त्यामुळं उच्च प्रतीचं सोयाबीन साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होतांना दिसतोय.
जामखेडमध्ये रात्री सव्वा दहाच्या सुमारास एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबारकुणाल बंडू पवार वय 20 वर्ष असे गोळीबार झालेल्या तरुणाच नाव
शहरातील विंचरणा नदीजवळ रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली घटना, अज्ञात व्यक्तींनी केला गोळीबार
जामखेड पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींन विरोधात गुन्हा दाखल
या गोळीबारत तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी अहिल्यानगरला हलवण्यात आलं
मंत्री भरत गोगावले यांच्या अभिष्टचिंन सभेत आमदार प्रविण दरेकर यांची तटकरे यांच्यावर टिकामंत्री भरत गोगावले यांच्या अभिष्टचिंतन सभेदरम्यान भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी खा. सुनिल तटकरे यांच नव न घेता मिश्किल टिका केली.
गोगावले यांच्या अभिष्टचिंतन सभेचा उल्लेख नॅपकिन सभा असा करीत दरेकर यांनी नॅपकिन महत्वाचा किती असतो याची अठवण करून दिली.
अंगावर आल तर शिंगावर घ्यायची शिकवण या रायगडच्या मातीने दिल्याचे देखील दरेकर म्हणाले.
राष्ट्रवादी नसेल तरी भाजप शिवसेना आणि गोगावले यांच्या पाठिशी राहिल अस सुचक विधान करत असताना शिवसैनिक आणि गोगावले यांची अपूर्ण इच्छा पुर्ण होईल अशा शुभेच्छा दरेकर यांनी दिल्या.
यवतमाळ जिल्ह्यात शिक्षणाचा खेळखंडोबादोन हजारांवर शाळातून गोरगरिबांच्या शिक्षणाचा जिम्मा सांभाळणाऱ्या यवतमाळ जिल्हा परिषदेला शिक्षक भरतीत यश शेतांना दिसत नाही सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत जिल्ह्याला डच्चू मिळाला आहे आधीच प्राथमिक शिक्षकांच्या सातशे जागा रिक्त असताना आता 317 शिक्षक निवृत्त होत आहे त्यामुळे शिक्षणाचा दर्जा टिकवण्याची अहमहमिका सुरू असताना प्रत्यक्षात खेळखंडोबा होण्याची भीती आहे.
Pune Corona News: राज्यभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आता पुण्यातमुंबई पिंपरी चिंचवड सह इतर ठिकाणी संसर्गात मोठी वाढ
राज्यात गेल्या 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची लागण
65 रुग्णांपैकी सर्वाधिक पंचवीस रुग्ण हे पुण्यातील असल्याची माहिती
एकूण 65 रुग्णांपैकी 25 पुणे महापालिका, मुंबईत 22, ठाण्यात 9, पिंपरी चिंचवड मध्ये 6, कोल्हापूर मध्ये 2 तर नागपूर मध्ये एक अशी संख्या आहे
तुळजाभवानी मंदिरात पुजा साहीत्याची अनधिकृतपणे विक्रीतुळजाभवानी मंदिरात अनधिकृतपणे पुजेचे साहीत्य विक्री करताना 21 पुजेचे ताट व फळांचे कॅरेट जप्त केले आहे.
तुळजाभवानी मंदिरात भाविकांच्या श्रध्देचा फायदा घेत काही अनाधिकृत विक्रेते मंदिर परीसरात नियमबाह्य पध्दतीने पुजेसाठी लागणारे ओटीचे साहीत्य विक्री करत असताना मंदिर प्रशासनाच्या सुरक्षा विभागाने छापा टाकत कारवाई केलीय.
मंदिर संस्थानच्या वतीने अचानक केलेल्या कारवाईमुळे मंदिरातील अनधिकृत विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन परीक्षा तीन ते पाच जून दरम्यान होणारविद्यार्थ्यांना घरबसल्या ही परीक्षा ऑनलाइन देता येणार आहे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील शैक्षणिक विभागांमध्ये असलेल्या अभ्यासक्रमासाठी परीक्षा घेण्यात येणार
नकारात्मक गुण पद्धतीची ही परीक्षा 100 गुणांची आहे
ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया घेतली जाणार
उर्वरित अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रपणे राबविण्यात येणार
Pandharpur: श्रींच्या पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान, ७०० वारकऱ्यांचा सहभागपंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे हे ५६ वे वर्ष आहे.
श्रींच्या पालखीत जवळपास सातशे वारकऱ्यांसह, टाळकरी, वारकरी, पताकाधारी, हरीनामाच्या गजरात जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल नामाचा जपकरीत संत नगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
एकादशीला भूवैकुंठ पंढरपूरच्या विठोबाची महायात्रा आषाढी, कार्तिकी, चैत्र व माघी अशा चार एकादशीला पंढरपूरला भरते.
Amravati: अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई* प्रतिबंधित असलेल्या HTBT कपाशीची 1500 पाकिटे जप्त..
* पिंपळोद येथील प्रशांत रामदास नवलकार यांच्या घरी व गोडाऊनवर छापा टाकून धडक कारवाई...
* उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव, तालुका कृषी अधिकारी आरती साबळे यांच्या पथकाची कारवाई...
* या कारवाईत १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..
* या प्रकरणी येवदा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू..
अकोला शहरातील रद्द झालेल्या जन्म प्रमाणपत्र प्रकरणी एमआयएमने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनअकोला शहरातील रद्द झालेल्या जन्म प्रमाणपत्र प्रकरणी एमआयएमने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते..
सुरुवातीला अधिकारी चर्चेस तयार नव्हते, मात्र आंदोलन केल्याने चर्चा केली, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पुन्हा प्रमाणपत्र मिळू शकेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तातडीने तोडगा निघून प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल, असा इशारा एमआयएमने दिला.
दरम्यान, भारतात बांगलादेशी घुसखोर बनावट जन्म प्रमाणपत्रांच्या आधारे अवैधरीत्या वास्तव्यास असल्याचे भाजप नेत्यांनी आरोप केला होता..
त्यानंतर जन्म व मृत्यू प्रमाण वितरण करण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत करू नये असे, असे आदेश प्रशासनाचे आहेत.. त्यामुळेच एमआयएम आक्रमक झाली होती..
Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिकेकडून उधळपट्टी सुरूचनवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ विभागामध्ये सध्या जोरदार उधळपट्टी सुरू आहे अनेक ठिकाणी गरज नसताना सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेकडून काम काढली जात आहेत तसेच काम करत असताना अनेक प्रकारे झाडांची तोडणी केली जाते तर काही ठिकाणी टेंडर न काढता थेट ठेकेदारांना काम दिली जात आहेत त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर भाजप महिला आघाडीच्या नेत्या मंगला घरत यांनी व्हिडिओतून महापालिकेचा कामाबाबत आवाज उठवला आहे