शोमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध राज कपूर यांच्याबद्दल असं म्हंटल जातं की भविष्यात प्रेक्षकांना कोणत्या प्रकारचा सिनेमा पहायला आवडेल हे त्यांना तेव्हा कळलं होतं. त्यांच्या या विचारांची उत्पत्ती 'बॉबी' आणि 'मेरा नाम जोकर' सारखे चित्रपट होते. त्यांच्याकडे चित्रपटांसाठी ज्ञानाचा प्रचंड साठा होता. राज कपूर यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून उत्कृष्ट काम केलं. राज कपूर हे असं नाव आहे ज्याने अनेक लोकांचं नशीब देखील बदललं. मात्र एक अभिनेत्री होती जी त्यांचा प्रचंड राग राग करायची.
राज कपूर यांनी अनेक चेहरे स्टार केले.राज कपूर यांनी अनेक नवीन चेहरे पडद्यावर आणले आणि त्यांना स्टार बनवलं. सर्वांनाच ते आवडायचे, पण या चित्रपटसृष्टीत एक नाव असं होतं जिला राज कपूर अजिबात आवडत नव्हते. तिच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. अभिनेत्री साधना आणि राज कपूर यांचं एकमेकांशी अजिबात पटलं नाही. पहिल्या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर असं काही घडलं की दोघांनीही पुन्हा कधीही एकत्र काम केलं नाही.
साधनाच्या या सवयीने सर्वांनाच त्रास दिलाअसं म्हटलं जातं की, ज्या काळात प्रत्येक अभिनेत्री तिच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जात असे, त्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत एक अशी अभिनेत्री आली जी तिच्या अनोख्या स्टाइल, सौंदर्य आणि केसांच्या शैलीसाठी चर्चेत होती, तिचं नाव साधना होतं. लोक तिच्या प्रत्येक शैलीचे वेडे होते. ती तिच्या काळातील ट्रेंड सेंटर होती. तिने जे काही केलं ते लोकप्रिय झालं, मग ती तिची केसांची शैली असो किंवा ड्रेसिंग स्टाईल असो. असं म्हटलं जातं की साधना तिच्या केसांची विशेष काळजी घेत असे आणि राज कपूर यांना तिची ही सवय आवडली नाही.
'मुंड मुंड के ना देख' या गाण्यात दिसली साधना'श्री ४२०' या चित्रपटात साधनाने पहिल्यांदा राज कपूर यांच्यासोबत काम केलं. या चित्रपटात तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. 'मुंड मुंड के ना देख' या गाण्यात साधना दिसली होती. या गाण्यात तिने एका कोरस गर्लची भूमिका साकारली होती. या गाण्याच्या शूटिंगदरम्यान साधना आणि राज कपूर यांच्यात वाद झाला होता. शूटिंगदरम्यान साधना तिच्या केसांची खूप काळजी घ्यायची आणि ती वारंवार केस विंचरायला जायची. राज कपूर यांना तिची ही सवय अजिबात आवडली नव्हती. अशा परिस्थितीत त्यांनी साधनाला अनेक वेळा असं करण्यास मनाईही केली. पण अभिनेत्रीने त्यांचं ऐकलं नाही.
साधना सेटवरून निघून गेलीवारंवार विनंती करूनही साधनाने राज कपूर यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष केले तेव्हा ते संतापले. एके दिवशी त्यांनी अभिनेत्रीला अभिनय सोडून लग्न करून कायमचं घरी राहायला सांगितलं. राज यांच्या या वाक्याचं साधनाला खूप वाईट वाटलं, ती लगेच सेटवरून निघून गेली. त्यानंतर साधना राज कपूर यांचा द्वेष करू लागली. त्यानंतर दोघेही बराच काळ एकत्र दिसले नाहीत. त्यानंतर सुमारे ६ वर्षांनी साधना आणि राज कपूर यांनी 'दुल्हा दुल्हन' चित्रपटात एकत्र काम केलं.