अक्षय गवळी, साम टीव्ही
Akola Crime : अकोल्यात एका सेवानिवृत्त 60 वर्षीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियातांची हत्या झाल्याची घटना घडली आहे.. अकोल्यातील रणपिसे नगरात हे थरारक हत्याकांड घडलंय. संजय कौसल असं हत्या करण्यात आलेल्या माजी अभियातांचं नाव आहे. तर महेंद्र विश्वासराव पवार असं मारेकरी व्यक्तीच नाव आहे. रणपिसे नगरातील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी टिकासने वार करीत त्यांना जागीच ठार केले. विशेष म्हणजे संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पोलीसांचा त्या दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान जुन्या वादातून हे हत्याकांड घडले असल्याचे बोलले जाते.
याआधीही त्याने एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला होता. तसेच गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. काही दिवसापूर्वीच मारेकरी पवार हा न्यायालयीन जामिनावर बाहेर आला होता.
दरम्यान, रणपिसे नगरातल्या मुरलीधर टॉवर येथे हत्याकांड घडले. विशेष म्हणजे मारेकरी आणि मृतक हे दोघेही मुरलीधर टॉवर्स येथील रहिवासी आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. आरोपीच्या शोधात पोलिसांचे 2 पथक रवाना झाल्यात. संजय कौसल यांची हत्या केल्यानंतर आरोपी महेंद्र फरार झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच भाजपचे आमदार रणधीर सावरकर घटनास्थळी पोहोचले आहेत. महेंद्रने लोखंडी टिकासने वार करीत संजय कौसल यांना जागीच ठार केलं. रणपिसे नगरातील या घटनेने परिसरात भीती पसरली आहे.