रुहीनी खदसे वर रुपाली चकणकर: विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या अध्यक्षतेखाली आज महिला आयोगाच्या कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्वे आणि अडचणींचा आढावा घेण्यासंदर्भात विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. विधान भवनात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर (Vaishnavi Hagawane Case) महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. याविषयी आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. मात्र आयोगावर याआधी काम केलेल्या अनेक माजी सदस्यांना या बैठकीचे निमंत्रण न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या की, आजची विधानभवन मधील बैठक म्हणजे उशिरा सुचलेले शहापण आहे. आधी बैठका घेतल्या असत्या तर वैष्णवी हगवणेचा जीव वाचला असता. आज महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा आम्ही मागतोय म्हणून यांना आता बैठका घेण्याचं सुचलं आहे. बैठका घेण्याचा दिखावा बंद करा. सध्या आयोग व्यक्तीकेंद्रित आहेत म्हणून 7 सदस्य यांनी भरले नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या की, त्या म्हणतात हुंडा बळीच्या झिरो पेंडण्सी आहे. या मॉडर्न महिलाध्यक्षा आहेत. केवळ आलेल्या मेलला पोलीस स्टेशनला फॉरवर्ड करणे हे त्यांचं काम आहे का? पोस्टाने ज्या तक्रारी येतात त्याची दखल या घेत नाहीत का? प्रिया फुके यांनी एक वर्षापूर्वी पोस्टाने तक्रार केली आणि या म्हणतात प्रिया फुकेची तक्रार आमच्याकडे आली नाही. खेड्यापाड्यात राहणाऱ्या महिला मेलवर कशा तक्रारी करणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.
आयोगाच्या अध्यक्षांनी दिखावा करून काम केलं नसतं वेगळं चित्र पाहिला मिळालं असतं. पाच ते सहा महिने या आयोगाच्या बैठका देखील घेत नाहीत. त्यांना एकावेळी दोन जबाबदाऱ्या झेपत नाहीत. त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. कारण त्यांचा सगळा वेळ पक्षाचे काम करण्यात जातो, अशी टीका रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर केली आहे.
https://www.youtube.com/watch?v=D9RTUYUACLO
आणखी वाचा
आणखी वाचा