वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रचंड टीका होता आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबई महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर मंथन होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडत आहे.
ठरलं! प्रभाग रचना राज्य सरकारच करणारसर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता या प्रक्रियेला वेग आला आहे. राज्य सरकार या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करणार असून त्याबाबतचे आदेश येत्या दोन दिवसात निघण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने प्रभाग रचना केल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे येईल.