Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न पडला असेल तर स्वादिष्ट कोथिंबीर व मटारचे पॅटीस ट्राय करू शकता. हे बनवायला सोपे असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया स्वादिष्ट कोथिंबीर व मटारचे पॅटीस बनवण्यासाठी कोणते साहित्य लागेल आणि कृती काय आहे.
कोथिंबीर व मटारचे पॅटीस बनवण्यासाठी लागणारे साहित्यअर्धा किलो चांगल्या प्रतीचे बटाटे, दीड कप मटारचे दाणे, 4, 5 टेबलस्पून हिरवीगार कोथिंबीर, 2 चमचे भाजलेल्या तिळाची पूड, 4 टेबलस्पून ओलं खोबरं, 1 चमचा बारीक चिरलेलं आलं, 4 हिरव्या मिरच्या वाटून, थोडे बेदाणे, फोडणी साहित्य, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, मिरेपूड अर्धा चमचा.
कोथिंबीर व मटारचे पॅटीस बनवण्याची कृतीबटाटे उकडून, सोलून, किसून घ्या. मीठ, मिरेपूड व कॉर्नफ्लोअर घालून मळून थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा. मटार जाडसर वाटा. हिंग-मोहरीची फोडणी बनवून, मटार घाला. परतून घ्या. गार करा. मग कोथिंबीर, नारळ, आलं, बेदाणे, 2 चमचे साखर, मीठ घाला. बटाट्याच्या पारीत सारण भरून तळून घ्या.