नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 5 जून रोजी (World Environment Day) जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरण आणि झाडे यांचा खूप जवळचा संबंध आहे. मानवाच्या आयुष्यात झाडांचं विशेष महत्त्व आहे. झाडे पर्यावरणाला स्वच्छ करतात, हवामान सुधारतात आणि जैवविविधता वाढवतात. निरोगी आरोग्यासाठीही झाडे उपयुक्त असतात. झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात. त्यामुळे शुद्ध हवेसाठी घराच्या आसपासच्या परिसरात आणि घरात काही झाडे असावीत असे सांगितले जाते. आज आपण अशी काही झाडे पाहणार आहोत जी हवा शुद्ध करण्यासोबतच अनेक प्रकारे मानवासाठी उपयुक्त ठरतात. चला तर मग जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जाणून घेऊयात कोणती झाडे आपण लावायला हवीत, जी आरोग्यासाठी वरदान ठरतील.
कोणती झाडे लावाल?
वड, पिंपळ, आवळा, बेल, उंबराचं झाड ही झाडे आपल्या आसपास असणे आवश्यक आहेत. याशिवाय काही झाडे तुम्ही घरातही लावू शकता. जसे की, मनी प्लांट, जेड प्लांट, एरिका पाम आदी वनस्पती.
वड –
वडाचं झाड सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन देणारा आहे. आयुर्वेदानुसार यात अनेक औषधी गुणधर्म असतात. आयुर्वेदात सर्दी-खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी एक उपाय सांगण्यात आला आहे, त्यानुसार वडाचे मूळ उगाळून प्यायल्यास कफ-खोकल्यापासून सुटका होते.
पिंपळ –
पिंपळाची पाने, फळ आणि मूळ सर्वांमध्येच औषधी गुणधर्म असतात. आरोग्याच्या विविध तक्रारींवर याचा उपयोग होतो.
आवळा –
बहुगुणी आवळा पचनसंस्थेसाठी हितकारी आहे. लहान मुलांना जंत झाले असतील तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने आवळ्याचा वापर करू शकता, नक्कीच फरक जाणवेल.
उंबर –
जलसंवर्धनाकरता उंबराचं झाड सर्वात फायदेशीर मानले जाते. हे झाड आपल्या मुळामध्ये पाणी धरून ठेवतो. याशिवाय यात अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत.
घंटा
बेलाचे पान पूजेत वापरले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात या पानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कफाच्या त्रासाला कंटाळले असाल तर बेलाचे फळ त्यावर रामबाण उपाय असेल.
पैसे वनस्पती –
मनी प्लांट वास्तुशास्त्रानुसार शुभ झाड मानण्यात आले आहे. हे प्लांट मोनोक्सोइडसारख्या अपायकारक घटकांना हवेतून शोषून घेतो आणि हवा शुद्ध करतो.
साप वनस्पती –
हवेच्या शुद्धीसाठी स्नेक प्लांट उत्तम पर्याय आहे. एलर्जीपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही हे झाड घरात लावू शकता.
शांती कमळ –
पिस लिली या झाडाला रोज पाणी घालण्याची गरज नसते. या झाडाला दिवसातून दोन तास जर सूर्यप्रकाश मिळाला तरी पुरेसा असतो. याशिवाय हे झाड घरातील ओलावा शोषून घेतो.
एरिका पाम –
एरिका पाम हे झाड हवेतील विषारी पदार्थ शोषून घेण्यास उपयुक्त असते. याशिवाय घशातील खवखव कमी करते.
झेड प्लांट –
जेड प्लांट पर्यावरणाच्यादृष्टीने आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. तणाव कमी करून शांत झोप लागण्यासाठी हे झाड उत्तम पर्याय आहे.
हेही पाहा –