सायन स्थानकात पावसाचे पाणी
धारावी, ता. ४ (बातमीदार) : मध्य रेल्वेवरील सायन रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक एकच्या छतावरील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी केलेली सोय फोल ठरली आहे. पाणी वाहून नेणारी व्यवस्था नादुरुस्त झाल्याने स्थानकातील फलाटावर पाणीच पाणी झाले आहे.
स्थानकातील पादचारी पुलावरील छत गळत असल्याने प्रवाशांना पाण्याचा मारा सहन करीत लोकलची वाट पाहावी लागते. रेल्वे प्रशासनाने लवकरात-लवकर या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.