देशाच्या संरक्षण दलात काम करण्याची संधी प्रत्येकालाच मिळत नाही. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. अशीच मेहनत कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी येथील एका मुलीने घेतलीय.
नेसरीच्या श्रेया मिलिंद देसाई हिच्या मेहनतीची सध्या जिल्ह्यातच काय तर देशात चर्चा होत आहे. तिची भारतीय नौसेनेमध्ये लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली आहे.
नुकताच 31 मे 2025 केरळच्या इझीमाला येथे इंडियन नेव्हल अकॅडमी येथे श्रेयाची झाली ज्यात ती परेड पास आऊट झाली
आता ती भारतीय नौसेनेमध्ये लेफ्टनंट पायलट म्हणून कार्यरत होणार आहे
तिच्या या कर्तुत्वाने नेसरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून तिच्यावर कौतुकासह अभिनंदनचा वर्षाव होत आहे. जिल्ह्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी देखील तिचे कौतुक केले आहे
श्रेयाचे कोल्हापूरच्या छत्रपती शाहू विद्यालयातून शिक्षण झाले असून अभियांत्रिकी पदवीधर तसेच संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेत बीटेक झाले
त्यानंतर तिने तारा कमांडो हे युवती कमांडोसाठी खास असणाऱ्या युनिटमध्ये प्लाटून कमांडर म्हणून काम केले आहे
विषेश म्हणजे तिची सक्षम फौडेशन नावाच्या स्वयंसेवी संस्था असून शाळा आणि इतर चर्चा सत्रातून बाललैंगिक शोषण आणि विनयभंगाबद्दल जागरुकता करण्याचे काम ही संस्था करते