Jivora: कापूस उत्पादकांना 'जिवोरा'ची साथ; पांढऱ्या माशा, तुडतुडे अन् माव्यापासून होणार सुटका
esakal June 05, 2025 01:45 AM

मुंबई : कापसावर लागणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बाजारात जिवोरा हे नवं किटकनाशक दाखल झालं आहे. यामुळं पांढऱ्या माशा, तुडतुडे आणि मावा यांसारख्या किटकांपासून कपाशीचं संरक्षण होण्यास मदत होणार असल्याचा दावा क्रिस्ट्ल क्रॉप प्रोटेक्शन लिमिटेडनं (सीसीपीएल) केला आहे. याद्वारे क्रिस्ट्लचा कीटकनाशक पोर्टफोलिओ ७ टक्क्यांनी वाढवण्यात 'जिवोरा' मदत करणार असल्याचा कंपनीला विश्वास आहे.

भारतातील पीक-संरक्षण बाजारपेठेच्या २.५९ अब्ज डॉलर्सच्या उलाढालीत २०३० सालापर्यंत ३.२१ अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यातच क्रिस्टलनं आपल्या 'जिवोरा' या उत्पादनाची घोषणा केली आहे. कापसाच्या उत्पादनातील रसशोषक किडीच्या वाढत्या आव्हानावर मात करण्याच्या दृष्टीने हे उत्पादन विकसित करण्यात आलं आहे. कपाशीच्या ५ लाख एकरांतील पिकांपर्यंत हे उत्पादन पोहोचवण्याचा कंपनीचा मानस आहे. जिवोरा बाजारात आणल्यामुळं क्रिस्ट्ल क्रॉप प्रोटेक्शन कंपनीच्या कीटकनाशक पोर्टफोलिओमध्ये ७ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

सुरुवातीला आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, हरयाणा या राज्यांमधील प्रमुख बाजारपेठांमध्ये 'जिवोरा' हे किटकनाशक उपलब्ध करून दिलं जाणार आहे. दोन प्रभावी रासायनिक घटकांच्या मिश्रणातून हे तयार करण्यात आलं आहे. यामुळं ट्रान्सलेमिनार (पानाच्या एका बाजूला कीटकनाशक फवारले असता आतील बाजूपर्यंत पोहोचणारी) स्वरूपात क्रिया होते. ही क्रिया पांढऱ्या माशा (व्हाइटफ्लाइज), तुडतुडे (जॅसिड्स) आणि मावा (अॅफिड्स) आदी कीटकांपासून परिणामकारकरित्या संरक्षण मिळवून देते. हे कीटकनाशक जलद गतीनं आणि दीर्घकाळ टिकणारं नियंत्रण मिळवून देणारं असल्यानं ते दुसऱ्या आणि तिसऱ्या फवारणीदरम्यान ठोस संरक्षण पुरवते.

नवोन्मेष्कारी स्वरूपाचे मिश्रण आणि गुणवत्ता सिद्ध केलेली परिणामकारकता यांमुळं हे उत्पादन हजारो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल असा कंपनीचा दावा आहे. क्रिस्ट्लच्या अधिकृत वितरण नेटवर्कमध्ये जिवोरा ५० ग्रॅम, १०० ग्रॅम, २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम आणि १ किलो वजनाच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे.

क्रिस्ट्ल क्रॉप प्रोटेक्शनचे व्यवस्थापकीय संचालक अंकूर अगरवाल म्हणाले, 'जिवोरा' हे केवळ कीटकनाशक नाही, कापूस शेतकऱ्यांना अधिक निरोगी पीक आणि सुधारित नफा मिळवून देण्याची ही ग्वाही आहे. या उत्पादनाची दुहेरी काम करणारी यंत्रणा आणि ‘फिटो-टॉनिक’ (अतिरिक्त लाभ मिळवून देणारा) प्रभाव यांच्यामुळं जिवोरा कीटक नष्ट करण्यासोबतच पिकाच्या आरोग्याचीही काळजी घेतं,” तर क्रिस्ट्ल क्रॉप प्रोटेक्शनच्या विक्री व मार्केटिंग विभागाचे उपाध्यक्ष सोहित सत्यावली सांगतात, "शेतकऱ्यांच्या पिकाला जास्तीत-जास्त संरक्षण मिळावं आणि त्यांना चांगला नफा मिळावा हे आमच्यापुढील लक्ष्य आहे"

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.