भाजप आमदार सुरेश धस यांनी सुपेकर यांनी 300 कोटी घेतल्याचा गौप्यस्फोटावर माजी आमदार भीमराव धोंडे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. कोणताही अधिकारी 300 कोटी रुपये मागू शकत नाही. 300 कोटी घेणे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यासारखं आहे, आपले पोलिस लंडनच्या पोलिसांपेक्षा चांगले काम करत आहेत, असे माजी आमदार धोंडे यांनी म्हटले आहे.
ShivSena Eknath Shinde : मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थित अहिल्यानगरमध्ये शिवसेनेचा मेळावाशिवसेना मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थित शनिवारी (ता. 7) दुपारी दोन वाजता अहिल्यानगर शहरात मेळावा आयोजित केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होणार असून, नगर शहर, श्रीगोंदा आणि पाथर्डीतील स्थानिक राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.
Reserve Bank of India : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक; व्याजदरात सलग तिसरी कपात?रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा निर्णय आज शुक्रवारी अपेक्षित आहे. बहुतांश विश्लेषकांमध्ये कपातीबाबत सहमती दिसून येत असली, तरी अनेकांच्या मते ती मागील दोन खेपांप्रमाणे पाव टक्केच राहील, तर काहींच्या मते यंदा थेट अर्धा टक्का कपात केली जाऊ शकते.
Nitesh Rane Vs Idris Naikwadi : मंत्री नीतेश राणेंना वेळीच आवर घाला; NCP आमदार नायकवडी यांची मागणीहिंदू नेता बनण्याच्या नादात मंत्री नीतेश राणे बालिश वक्तव्य करत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वाचाळवीराला वेळीच आवर घालावा, असे आवाहन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. मंत्री राणे बकरी ईदच्यानिमित्ताने मुस्लिम समाजाबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य करत असल्याचा आरोप आमदार नायकवडी यांनी केला.
ladki bahin yojana : 'लाडकी'साठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा वळवलासामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागागकडे 7 हजार 314 कोटी निधी कमी आहे. वळविलेला निधी फक्त लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती-जमातीच्या महिलांना वितरीत केला जाणार आहे. सामाजिक न्याय विभागाचं खातं शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. यामुळे महायुतीमध्ये धुसफूस होण्याची शक्यता आहे.
Water Scheme : पाणीपुरवठ्याच्या 900 योजनांची मान्यता रद्दनागरिकांचा विरोध, निधीची टंचाई आणि ठेकेदारांचे असहकार्य यामुळे गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून रखडलेल्या पाणीपुरवठ्याच्या 900 योजनाच रद्द करण्याचा निर्णय मृद आणि जलसंधारण विभागाने घेतला आहे.
Naxal Encounter : जहाल नक्षलवादी नेता टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधारक याचा खात्माजहाल नक्षलवादी नेता तसेच केंद्रीय समिती सदस्य टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधारक ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहचलम नायडू (वय 65, चिंतलपौंडी, आंध्रप्रदेश) हा गुरूवारी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात ही चकमक झाली. सुधाकर याच्यावर महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशा आणि झारखंड या राज्यांचे मिळून सुमारे तीन कोटींचे बक्षीस होते.
Shivrajyabhishek Sohala : किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळाकिल्ले रायगडगावर सहा जून तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून दीड लाख शिवभक्त गडावर दाखल होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्हा प्रशासनाकडून शिवभक्तांच्या जेवणासाठी पाच हजार किलो तांदूळ आणि एक लाख पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच गडावर15 बेडचे रुग्णालय, तर पाचाड इथं पाच बेडचा अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे.