Panchang 7 June 2025: आजच्या दिवशी 'शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा किमान 108 जप करावा
esakal June 07, 2025 01:45 PM

Panchang 7 June 2025:

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ७ जून २०२५

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  ज्येष्ठ १७ शके १९४७

☀ सूर्योदय -०६:००

☀ सूर्यास्त -१९:०४

चंद्रोदय - १५:५४

⭐ प्रात: संध्या - स.०४:५३ ते स.०६:००

⭐ सायं संध्या -  १९:०४ ते २०:१४

⭐ अपराण्हकाळ - १३:४५ ते १६:२४

⭐ प्रदोषकाळ - १९:०४ ते २१:१५

⭐ निशीथ काळ - २४:०९ ते २४:५५

⭐ राहु काळ -  ०९:१५ ते १०:५५

⭐ यमघंट काळ - १४:१३ ते १५:५२

⭐ श्राद्धतिथी -  द्वादशी श्राद्ध

सर्व कामांसाठी स.०६:३५ नं. शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५६ ते दु.०१:०० या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी भात खावू नये.

**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १४:१३ ते १५:५२

अमृत मुहूर्त-- १५:५२ ते १७:३१

विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:३१

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

शनि मुखात आहुती आहे.

शिववास ०६:३५ नं. कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी ०६:३५ नं. शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४७

संवत्सर - विश्वावसु

अयन - उत्तरायण

ऋतु -  ग्रीष्म(सौर)

मास - ज्येष्ठ

पक्ष -   शुक्ल

तिथी - एकादशी (०६:३५ प. नं. द्वादशी)

वार -   शनिवार

नक्षत्र -  चित्रा (११:०९ प. नं. स्वाती)

योग -  वरियान(१२:३५ प.नं. परिघ)

करण - भद्रा (०६:३५ प. नं. बव)

चंद्र रास - तुळ

सूर्य रास - वृषभ

गुरु रास - मिथुन

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे-7776816161

विशेष:-- भद्रा ०६.३५ प., सर्वेषाम् निर्जला एकादशी, या एकादशीस उपवास केल्यास १२ एकादशींच्या व्रताचे फळ मिळते, शर्करायुक्तजलकुंभदान, मु. इदुज्जुहा (बकरी ईद), गुरु वार्धक्यारम्भः, सर्वार्थसिद्धियोग ११.०९ नं., द्विपुष्करयोग ०६.३५ ते ११.०९

  या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.

  शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे.

  ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

   शनिदेवांना खजुराचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस काळे वस्त्र दान करावे.

  दिशाशूल पूर्व दिशेस असल्याने पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना काळे उडीद खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ , सिंह , तुळ , धनु , मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.