भिवंडी, ता. ७ (वार्ताहर)ः जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणाला चौघांनी मारहाण केल्याची घटना धामणकर नाका परिसरातील भय्यासाहेब आंबेडकर नगर येथे घडली. मारहाण करणाऱ्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
धामणकर नाका परिसरातील भय्यासाहेब आंबेडकर नगर येथील सिद्धांत वाघमारे ऊर्फ सोंट्या रात्री सार्वजनिक शौचालय परिसरात उभा असताना परिसरातील कुमार बनसोडे, मीना गायसुमुद्रे, रेखा गायसमुद्रे, करण गायसमुद्रे यांनी संगनमत करून सिद्धांतला शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. या वेळी मदतीसाठी आलेला हर्षे याच्या हाताला मार लागला आहे. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.