Shirur Crime : माहेराहून पैसे घेऊन ये, यासाठी डॉक्टर पत्नीला मारहाण करणाऱ्या सासरच्या मंडळींविरूद्ध गुन्हा दाखल
esakal June 08, 2025 04:45 AM

शिरूर - माहेराहून पैसे घेऊन ये, यासाठी डॉक्टर असलेल्या पत्नीकडे तगादा लावत तीला मारहाण करणाऱ्या पतीसह शारीरीक, मानसिक छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरूद्ध शिरूर पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला.

डॉ. पूजा महेश शेळके (वय-२८, रा. बाबूराव नगर, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी त्यांचे पती महेश सुरेश शेळके, सासू द्वारका सुरेश शेळके, सासरे सुरेश चंदरराव शेळके (सर्व रा. श्रीराम नगर सोसायटी, खराडी बायपास, पुणे) यांच्यासह सोनाली विवेक नेवाळे (रा. पिंपरी, पुणे) व चैताली प्रफुल्ल रनवरे (रा. वाघोली, पुणे) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, डॉ. पूजा शेळके या येरवडा येथील सह्याद्री हॉस्पिटल मधे कार्यरत असून, काही वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर काही दिवस आनंदात गेले.

मात्र, गेल्या वर्षभरात (जानेवारी २०२४ पासून) त्यांचे पती महेश व कुटूंबांतील इतरांनी तुझ्या बापाकडून पैसे घेऊन ये, असे म्हणत मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी करीत सतत अपमानीत केले. तसेच डॉ. पूजा यांचे वडील, आई व भावालाही वारंवार फोन करून शिवीगाळ केली.

डॉ. पूजा शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार शिरूर पोलिसांनी त्यांच्या पतीसह सासरच्या मंडळींविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस हवालदार दीपक राऊत करीत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.