वारंवार बस रस्त्यात बंद पडल्यामुळे संचलनातील फेऱ्यांवर परिणाम होत आहे. परिणामी प्रवाशांना बसची वाट पहावी लागते सर्व मार्गावरील बसची वारंवारता नियोजित वेळेत सुरू ठेवा, असे आदेश पीएमपीच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी सर्व आगार प्रमुखांना दिले आहेत नुकतेच पीएमपीने तिकीट दर वाढविले आहे. त्यामुळे उत्पन्नदेखील वाढत आहे बस मार्गावर सोडताना देखभाल दुरुस्ती करून सोडावी. प्रवासी संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा ब्रेकडाउनचे प्रमाण कमी करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
Raigad : तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणारकिल्ले रायगडावर 9 जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित रहाणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. या सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील देण्यात आले असून त्यांचा दौरा आला नसला तरी ते देखील येणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले आहे. यासह राज्यातील इतर मंत्री, स्थानिक खासदार आणि आमदार यांना देखील निमंत्रण दिल असून हा दैदिप्यमान सोहळा याची देही याची डोळा पहाण्यासाठी शिवप्रेमींनी उपस्थित रहावं असं निमंत्रण मंत्री भरत गोगावले यांनी दिल आहे.
Pune : महसूलनंतर पोलीस खात्यात सर्वाधिक लाचखोर, आकडेवारी आली समोरमहसूल पाठोपाठ पोलीस खात्यात सर्वाधिक लाचखोर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गेल्या पाच महिन्यात केलेल्या कारवाईतून आले दिसून
एक जानेवारी ते 31 मे पर्यंत महसूल विभागात सहा तर पोलीस विभागात पाच कारवाई
पुणे विभागात मार्च महिन्यात सर्वाधिक सहा गुन्हे लाचखोरी प्रकरणी नोंदवले गेले
भ्रष्टाचारात पुणे जिल्ह्यात पहिल्या स्थानी महसूल विभाग तर दुसऱ्या क्रमांकावर पोलीस विभाग असल्याचे आले समोर
पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाई मधून आकडेवारी समोर
Raigad : रायगडावर असणाऱ्या धनगर वस्तीला पुरातत्व खात्याच्या नोटीसारायगड किल्ल्यावरील धनगर वस्तीला पुरातत्व खात्याने गड रिकामा करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. धनगर समाजाची ही लोक झोपडीवजा घर बांधून गेल्या सात पिढ्यांपासून रायगड किल्ल्यावर रहात आहेत. गडावर येणाऱ्या शिवप्रेमी पर्यटकांना दही, ताक, चहा, नाष्ट्याची सुविधा पुरवून हे लोक आपला उदरनिर्वाह करीत आहेत. गडावरील बाजार पेठ आणि जगदीश्वर मंदीरच्या खालच्या बाजूला धनगर समाजाच्या वस्ती असून केंद्रीय पुरातत्व विभागाने ही वस्ती खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.
Akola : विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेशअकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अकोला महापालिकेचे माजी महापौर मदन भरगड यांनी मोठा निर्णय घेतला. मदन भरगड यांनी काँग्रेसची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रीवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थित भरगड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Gadchiroli : गोदावरी नदीत ६ मुलं बुडाली, शोध सुरूगडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत तेलंगणा हद्दीत मेडीगड्डा धरणाजवळ गोदावरी नदीत सहा मुलं बुडाली आहेत. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनं मोठी खळबळ उडालीय. अंघोळीला गेलेली मुलं बुडाल्यानंतर त्यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. पण मुलं सापडली नव्हती.
Pune News : पुणे-सातारा महामार्गावर कंटेनरच्या धडकेनंतर डंपर उलटलापुणे सातारा महामार्गावरील केळवडे येथे कंटेनरची डंपरला धडक बसून अपघात झाला. डंपरचा मागचा टायर फुटल्यानं डंपर उलटला. पुण्याच्या दिशेने जात असताना मालवाहू कंटेरनरने डंपरला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर डंपरचा टायर फुटून डंपर उलटला. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती मात्र अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
Pune Rain : पुण्यात आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊसमान्सूनची उत्तर सीमा ही स्थिर असून पूर्व विदर्भ ते अंतर्गत कर्नाटकच्या उत्तर भागापर्यंत द्रोणिका रेषा जात आहे. या प्रभावामुळे पुण्यात रविवारीही वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय.