वृक्षवल्ली आम्हा सोयरे...चा
घरडा कंपनीतर्फे संदेश
कंपनी परिसरात वृक्षारोपण; १९ हजार रोपांची करणार लागवड
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ः लोटे येथील घरडा केमिकल्स लिमिटेड कंपनीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षवल्ली आम्हा सोयरे.. हा संदेश देत वृक्ष लागवड केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चिपळूण उपप्रादेशिक अधिकारी श्रीपाद कुलकर्णी आणि क्षेत्र अधिकारी अधिकारी उत्कर्ष शिंगारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
लोटे येथे झालेल्या कार्यक्रमाला घरडा केमिकल्स लिमिटेडचे प्रमुख आर. सी. कुलकर्णी, उत्पादन प्रमुख पी. बी. पाटील आणि ओडल कृष्णन आणि घरडा कर्मचारी उपस्थित होते. वृक्षारोपणाचा संकल्प गतवर्षी २०२४-२५ मध्ये घरडा केमिकल्स लिमिटेडमार्फत ३८ हजार विविध प्रकारचे वृक्ष कंपनी आजूबाजूला लावण्यात आले. चालु वर्षात १९ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. यानिमित्त प्रत्येक कर्मचाऱ्याला एक रोपटे देण्यात आले आहे. त्यांनी या झाडांची जोपासना करून पुढील पर्यावरण दिन २०२६ रोजी त्यांचे विकसित झालेल्या स्थितीचे फोटो शेअर करण्याची सुचना दिली आहे.