Is milk safe to drink with high uric acid: आजच्या चुकीच्या जीवनशैली, असंतुलित आहार आणि व्यायामाच्या अभावमुळे यूरिक अॅसिड वाढण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. जंक फूड, रेड मीट, अल्कोहोल आणि साखरेचे जास्त सेवन केल्याने ही समस्या आणखी वाढते. यूरिक अॅसिड हा एक प्रकारचा कचरा आहे, जो शरीरात प्युरिन नावाच्या घटकाच्या विघटनाने तयार होतो.
सामान्य प्रमाणात ते लघवीद्वारे बाहेर टाकले जाते, परंतु जेव्हा त्याची पातळी वाढते तेव्हा ते सांध्यामध्ये जमा होऊ शकते आणि संधिवातसारख्या समस्या निर्माण करू शकते. अशावेळी आहाराची काळजी घेणे गरजेचे असते. बरेच लोक विचारतात की दूध पिल्याने यूरिक अॅसिड वाढते का? याबाबत तज्ज्ञ काय सांगतात हे जाणून घेऊया.
दूध का फायदेशीर आहे?कमी प्युरीन असलेले अन्न
दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ जसे की दही, ताक आणि चीजमध्ये प्युरीनचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे त्यांचे सेवन केल्याने युरिक अॅसिड नियंत्रणात राहते.
युरिक अॅसिडचे उत्सर्जन
दुधात असलेले पोषक तत्व शरीराच्या मूत्रपिंडांना सक्रिय आणि निरोगी ठेवतात. यामुळे गाळण्याची प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे जास्तीचे युरिक अॅसिड लघवीद्वारे सहजपणे बाहेर टाकले जाते आणि शरीर संतुलित राहते.
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी
दुधामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते. जे हाडे मजबूत करते. हे पोषक घटक वाढलेल्या युरिक अॅसिडमुळे होणारे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे आराम मिळतो.
काय संबंध आहे?दूध आणि दुग्धजन्य पदार्थांबद्दल अनेक गैरसमज आहेत. परंतु वैज्ञानिक संशोधन आणि पोषण तज्ञांच्या मते दुधामुळे यूरिक अॅसिड वाढत नाही. तसेच ते नियंत्रित करण्यास मदत करते. दुधात असलेले प्रथिने, विशेषतः 'केसिन' आणि 'व्हे प्रोटीन' - शरीरातून अतिरिक्त यूरिक अॅसिड काढून टाकण्यास मदत करतात.
कसं आणि किती सेवन करावं?युरिक अॅसिडच्या रुग्णांसाठी दूध पिणे केवळ सुरक्षितच नाही तर फायदेशीर देखील आहे. नियमित, मर्यादित आणि योग्य प्रमाणात दूध प्यायल्याने युरिक अॅसिड संतुलित राहण्यास मदत होते. युरिक अॅसिड वाढलेल्या लोकांनी फुल फॅट दुधाऐवजी टोन्ड किंवा स्किम्ड दुधाचे सेवन करावे. दिवसातून एक ते दोन ग्लास दूध पुरेसे आहे. तुम्ही हळद टाकून दूधाचे सेवन करु शकता. जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि सूज कमी करते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.