तुळजापूर - राज्याचे माजी परिवहनमंत्री आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मधुकरराव चव्हाण यांनी वयाच्या 90 व्या वर्षी चारचाकी वाहन चालविले.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे माजी परिवहनमंत्री, दुग्धविकास मंत्री, राज्याच्या विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग, अणदूर, तुळजाभवानी कारखान्याच्या परिसरात सुमारे चार ते पाच किलोमीटर चारचाकी गाडी वयाच्या 90 वर्षी चालविली आहे.
सध्या कुठल्याच पदावर श्री चव्हाण कार्यरत नसले तरीही प्रचंड धैर्य आणि मनोबलाच्या जोरावर आज ही ते कामात गुंतून आहेत. ग्रामीण भागात अनेक कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित असतात. श्री चव्हाण यांनी त्यांच्या चालकाकडून गाडीची चावी घेऊन स्वतः स्टेअरिंगवर बसून चार ते पाच किलोमीटर गाडी चालवली आहे.
श्री. चव्हाण यांच्या या कृतीमुळे तरूण पिढीला आदश॔ घेण्यासारखे काम त्यांनी केले आहे. तालुक्यातील अणदूर भागात श्री चव्हाण यांच्या कार चालवण्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होती. तसेच अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींना ही बाब समजलेली आहे.
होय, मी 25 वर्षे वाहन चालविले
तालुक्यात राजकीय क्षेत्रात काम करताना मी 25 वर्षे वाहन चालविलेले आहे. वाहन चालविण्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्यामुळेच मी सोमवारी चारचाकी वाहन चालविले आहे.
- मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री, तुळजापूर.