Bike Riding : बाईक ट्रिपसाठी हे मार्ग उत्तम
Marathi June 11, 2025 07:25 PM

पावसाळा म्हटले की, अनेकांचे बाईक रायडिंगचे प्लॅन सुरू होतात. विशेष करून पुरूष वर्गासाठी बाईक राईड म्हणजे आवडता विषय असतो.पण, हल्ली कित्येक मुलीही मोठ- मोठ्या, वजनदार बाईक्स सहजपणे चालवताना दिसतात. हे बाईक रायडर्स बाईक ट्रिपसाठी साहस आणि निसर्गाचा अद्भूत अनुभव मिळेल अशा नवीनवीन ठिकाणांचा शोध घेत असतात. काहीजण सोलो बाईक राईडसाठी निघतात तर काही ग्रुपने. तुम्हीही बाईक राईडचा प्लॅन करत असाल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचावी. आज आम्ही तुम्हाला असे काही मार्ग सांगणार आहोत, जे बाईक रायडिंगसाठी अगदी उत्तम ठिकाणे आहेत आणि जे आपल्या देशातच आहेत.

म्हैसूर ते वालपराई –

म्हैसूर ते वालपराई हा मार्ग 345 किलोमीटरचा आहे. या रोमांचक मार्गावर उटी आणि कोईम्बतूर ठिकाणे येतात. तुम्हाला या मार्गावर बाईक राइड करताना अप्रितम निसर्ग सौंदर्य अनुभवता येईल. येथे अनेक चहाचे मळेही आहेत.

मनाली ते लेह –

मनाली ते लेह देशातील सर्वात कठीण आणि धोकादायक माऊंटन बाईक रूटपैंकी एक आहे. तुम्हाला चित्तथरारक अनुभव घ्यायचा असेल तर येथे नक्की जा.

लेह ते झंस्कर –

लेह ते झंस्कर या मार्गावर तुम्हाला स्वर्गसुखाचा अनुभव घेता येईल. येथील वळणदार रस्ते, तलाव, धबधबे आणि नद्या पाहण्यासारखे आहेत.

मुंबई ते गोवा –

मुंबई ते गोवा हा मार्ग सुमारे 850 किलोमीटर लांबीचा आहे. विकेंड घालवण्यासाठी मुंबईकर अनेकदा या मार्गावरून जातात.

कोचीन ते कोडाईकनाल –

हा मार्ग कोचीन ते दक्षिण घाट म्हणजे कोडाईकनाल पर्यंत आहे. या संपूर्ण मार्गावर चहाचे मळे पाहता येतात.

जयपूर ते जैसलमैर –

जयपूर ते जैसलमैर मार्गावर तुम्हाला पुष्कर तलाव आणि उम्मेद भवन म्युझियम पाहता येईल. 558 किलोमीटरचा हा मार्ग तुम्हाला पूर्णपणे वेगळा आणि अद्भूत अनुभव देणारा आहे.

गुवाहाटी ते तवांग –

तुम्हाला पर्वत आणि दऱ्यांचा अनुभव घ्यायचा असेल येथे बाईक रायडिंगला जा. या सहलीत तुम्हाला हिमालय पर्वत रांग, घनदाट पावसाळी जंगल आणि नद्याही पाहता येतील.

अहमदाबाद ते कच्छ –

अहमदाबाद ते कच्छ मार्गात तुम्हाला वाळंवट पाहता येईल. पण, बाईक रायडिंगसाठी डिसेंबर ते मार्च हा काळ उत्तम आहे.

दार्जिलिंग ते सिलिगुड –

ईशान्य भारतातील सिलिगूड ते दार्जिलींग ठिकाण बाइक राइडसाठी बेस्ट ठिकाण आहे. येथे तुम्हाला चहाच्या मळ्यातून प्रवास करण्याचा अनुभव घेता येईल.

 

 

हेही पाहा –

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.