पाकिस्तान या मुस्लीम देशाला धोका देणार? अमेरिकेने इस्त्रायलसाठी अशी केली रणनीती
GH News June 12, 2025 03:21 PM

पाकिस्तान आणि इराणची सीमा मिळतात. इराणची अण्वस्त्र, इराणचे ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र अमेरिका आणि इस्त्रायलसाठी धोकादायक ठरणार आहे. या परिस्थितीत पाकिस्तान इराणविरोधात अमेरिकेला मोठी मदत करु शकतो. यामुळेच यूनाइटेड स्टेट्स सेंट्रल कमांडचे कमांडर जनरल मायकल कुरिल्ला यांनी पाकिस्तानला दहशतवाद विरोधातील लढाईत महत्वाचा भागीदार म्हटले. त्यांनी आयएसआयचेही कौतूक केले. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानची मदत अमेरिकेला हवी आहे.

ईराणच्या अणूउर्जा प्रकल्पावर इस्त्रायलने हल्ला केला तर अमेरिकेला इराणचा हल्ल्यास काउंटर करण्यासाठी फॉरवर्ड लॉजिस्टिक बेसची गरज आहे. त्या ठिकाणावरुन अमेरिका आपल्या फायटर जेट्समध्ये इंधन भरु शकतो. तसेच अमेरिकेला पाकिस्तानच्या एअरस्पेसची गरज आहे. त्यामुळे इराणविरोधात दुसरी आघाडी अमेरिकेला उघडता येणार आहे. त्यासाठी अमेरिकाला पाकिस्तानची मदत हवी आहे.

अमेरिकन अधिकाऱ्यांना अचानक पाकिस्तानचे कौतूक सुरु केले आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील देशांना धक्का बसला आहे. अमेरिका अचानक असे का करत आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कॅनडामधील सबीसी न्यूजने दावा केला की, इस्त्रायल इराणावर हल्ला करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. इस्त्रायलने हा हल्ला केल्यावर हे युद्ध भीषण होणार आहे. त्यावेळी अमेरिका इस्त्रायलचा सोबत असणार आहे. रिपोर्टनुसार, इस्त्रायलचा हा हल्ला थेट इराणमधील अणूउर्जा केंद्रांवर असणार आहे. त्यामुळे इराणकडून प्रत्युत्तर होणार आहे. इराणकडे घातक क्षेपणास्त्रे आहेत. एकट्या इस्त्रायलला हा हल्ला रोखता येणार नाही. त्यावेळी अमेरिका पाकिस्तानची मदत घेणार आहे. यामुळे पाकिस्तानी अधिकाऱ्यांना खूश करण्याचे काम अमेरिकेने सुरु केले आहे.

इस्त्रायल-इराण युद्ध पेटल्यावर इराण अमेरिकेच्या सैन्य ठिकाणांवर हल्ला करु शकतो, अशी भीती अमेरिकेला वाटू लागत आहे. यामुळे अमेरिकेत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांचे महत्व वाढले आहे. अमेरिकन लष्कराच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुनीर यांना बोलवले आहे.

पाकिस्तान आणि इराणची सीमा मिळतात. इराणची अण्वस्त्र, इराणचे ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र अमेरिका आणि इस्त्रायलसाठी धोकादायक ठरणार आहे. या परिस्थितीत पाकिस्तान इराणविरोधात अमेरिकेला मोठी मदत करु शकतो. यामुळेच यूनाइटेड स्टेट्स सेंट्रल कमांडचे कमांडर जनरल मायकल कुरिल्ला यांनी पाकिस्तानला दहशतवाद विरोधातील लढाईत महत्वाचा भागीदार म्हटले. त्यांनी आयएसआयचेही कौतूक केले. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानची मदत अमेरिकेला हवी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.