कागल : कागल तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेसाठी दुरंगी लढत
esakal June 12, 2025 11:45 PM

कागल तालुका प्राथमिक शिक्षक
पतसंस्थेसाठी दुरंगी लढत

१३ जागांसाठी २५ उमेदवार ः २२ जूनला मतदान

सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. १२ : कागल तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज, बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. १३ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात राहिल्याने ही निवडणूक लागली आहे. २२ जूनला मतदान होणार आहे. याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीत सर्वसाधारण गटातून ८ जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात आहेत. एनटी गटातून १ जागेसाठी २ उमेदवार, ओबीसी गटातून १ जागेसाठी २ उमेदवार, एससी गटातून १ जागेसाठी २ उमेदवार आणि महिला गटातील २ जागांसाठी ४ उमेदवार रिंगणात आहेत. संस्थेचे भाग भांडवल ३५ कोटी रुपये असून, सभासद ४२५ आहेत. मतदानासाठी ३८७ सभासद पात्र ठरले आहेत.
सत्ताधारी कागल तालुका शिक्षक आघाडीचे नेतृत्व माजी अध्यक्ष जी. एस. पाटील, एस. के. पाटील, वसंत जाधव, बाळनाथ डवरी करीत आहेत. सत्ताधारी आघाडीतर्फे बाबाजान पटेल, महादेव कोरे, विजय पाटील, आनंदा पाटील, पांडुरंग चव्हाण, संदीप शिंदे, रघुनाथ पाटील, आनंद मालवेकर, विश्वनाथ डफळे, काशीनाथ सुतार, दीपक माने, सुषमा मोरबाळे, पुष्पलता खोत निवडणूक रिंगणात आहेत. विरोधी कागल तालुका शिक्षक विकास आघाडीचे नेतृत्व पंडित भुरले, सुकुमार पाटील, के. व्ही. पाटील, डी. एम. कुंभार व ओमाजी कांबळे करीत आहेत. विरोधी आघाडीतर्फे पांडुरंग घुगरे, शंकर चौगुले, संदीप पाटील, कृष्णा कुंभार, अल्ताफ नदाफ, आण्णासाहेब पाटील, भाऊ कुंभार, युवराज सातुशे, संजय चिखलीकर, सागर डवरी, शैलजा चिखलीकर, प्रज्ञा प्रकाश पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
.....
चौकट
बिनविरोधचे प्रयत्न निष्फळ ...
कागल तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच नेते मंडळींनी प्रयत्न केले. शेवटच्या क्षणापर्यंत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, १३ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात राहिल्याने अखेर निवडणूक लागली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.